Jio share price
Esakal
पुणे – जिओच्या आयपीओला अर्ज करू का, असा प्रश्न काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राने मला विचारला. त्यानंतर काही दिवसांनी त्याचा पुन्हा मेसेज आला, आयपीओ मिळाला नाही यार! पण तरीही मला जिओ प्लॅटफॉर्म्सचा शेअर घ्यावासा वाटतोय. काय करू, घ्यावा की नाही?
माझ्या मित्राचाच नाही, तर अनेक गुंतवणूकदारांच्या मनात सध्या हा प्रश्न यतोय. जिओचा शेअर घ्यावा की एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्सचा? मुकेश अंबानी आणि एलॉन मस्क यांच्या कंपन्यांचं भवितव्य कसं असेल? यापैकी कोणत्या कंपनीत पैसे गुंतवणं फायद्याचं ठरेल?
अर्थतज्ज्ञ आणि गुंतवणूकविषयक सल्लागार वारंवार सांगतात की, पैशाचा निर्णय घाईघाईत किंवा भावनेच्या भरात घेऊ नये. मात्र, लोकप्रिय उद्योगपतींच्या कंपन्या चर्चेत आल्या की त्यांच्याविषयीची उत्सुकता आणि त्यातून होणारी गुंतवणूक हे आपसूकच होतं.
जिओ प्लॅटफॉर्म्सने २८ ऑक्टोबर २०२६ रोजी शेअर बाजारात पदार्पण केलं. दुसरीकडं, स्पेसएक्सचे शेअर्स अमेरिकेतील नॅस्डॅक बाजारात उपलब्ध आहेत. दोन्ही कंपन्या उपग्रहाच्या माध्यमातून इंटरनेटच्या माध्यमातून भविष्यात यशस्वी ठरण्याची शक्यता असली तरीही त्यांचे व्यवसाय, शेअरची रचना आणि कंपनीवरील नियंत्रणाची पद्धत वेगवेगळी आहे. त्यामुळेच सर्वात आधी या कंपन्यांची रचना, मताधिकार समजून घेणं गरजेचं आहे. या लेखाच्या माध्यमातून हा विषय सविस्तर समजून घेण्याचा प्रयत्न करूया.