
Unorganized sector survey
esakal
युगांक गोयल, कृती भार्गव
असंघटित क्षेत्रातील उद्योगांच्या वार्षिक सर्वेक्षणाचे (एएसयूएसई) त्रैमासिक ‘बुलेटिन’ नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले. भारतातील उद्योगक्षेत्रातील असंघटित क्षेत्र हे सातत्याने विस्तारणारे आहे. यावर कोट्यवधींच्या उपजीविका अवलंबून आहे. या ‘बुलेटिन’च्या माध्यमातून योग्य वेळी उपलब्ध होणारी आकडेवारीमुळे त्यावर आधारित व्यवहार्य धोरणे आखता येतात.
या सर्वेक्षणामुळेकेवळ या क्षेत्राची दखलच घेतली जाणार नाही, तर हे असंघटित उद्योगक्षेत्र सर्वसमावेशक अन् शाश्वत वाढीचा आधारस्तंभ बनविण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. गेल्या आठवड्यात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले. असंघटित क्षेत्रातील उद्योगांचे त्रैमासिक (क्यूबीयूएसई) प्रसिद्ध केल्याची माहिती त्यात देण्यात आली.