

koli Songs
sakal
हृदयनाथ मंगेशकर- saptrang@esakal.com
हृदय ! लोकगीतांमध्ये विलक्षण शक्ती असते. ती गीतं कुणा विद्वान पंडितांची नसतात, साध्या शेतकऱ्याची, साध्या कामगारांची ती हृदगत असतात. त्यात द्वैत, अद्वैत नसते.
त्यात वाद, विवाद, वितंडवाद, पांडित्य नसते,
असते ते फक्त भोळ्या माणसांचे साधे
बोलणे, साधे गाणे, जीवनाच्या धडपडीचे
कष्टमय बोल, साधे जगण्याच्याही
हाणामारीचे करुण बोल, भाकरी मिळेल का नाही?
याच्या चिंतेचे बोल आणि उपाशी हुंकार.