Premium|Kushal Badrike Acting Journey : शेवटची अभिनय स्पर्धा ठरली कुशल बद्रिके यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट

Kushal Badrike Acting Journey : शेवटची अभिनय स्पर्धा म्हणून रंगमंचावर उतरलेल्या कुशल बद्रिके यांना मिळालेले पहिले बक्षीस, नाटकाची संधी आणि पहिले प्रेम त्यांच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरले.
Kushal Badrike Acting Journey

Kushal Badrike Acting Journey

esakal

Updated on: 

आशिष पाथरे - sakal.avtaran@gmail.com

‘ही शेवटची एकपात्री अभिनय स्पर्धा... मग हे क्षेत्रच सोडायचं,’ असं एक नवखा नट ठरवतो. त्या स्पर्धेत त्याला बक्षिसासोबत फेम, देवेंद्र पेम आणि पहिलं प्रेमही मिळतं. आयुष्याला कलाटणी मिळते; पण त्यानंतरही त्याच्या प्रवासात अनेक अडथळे येतातच. त्यातून तो ‘कुशल’पणे वाट काढतो. तो लहानपणी नृत्यसमूहात गर्दीत लपला गेला होता अन्‌ आज त्याला बघायला गर्दी होते...

अभिनेता कुशल बद्रिकेचा हा प्रवास विलक्षण आहे.

काळ साधारण २५ वर्षांपूर्वीचा... होतकरू रंगमंचीय अभिनयगुणांना वाव देणारी एक एकपात्री स्पर्धा सुरू आहे. सध्याचा सुपरस्टार सिद्धार्थ जाधवसुद्धा सहभागी झालाय. चुरस आहे. एक असा नवा नट आहे, ज्याने ‘ही शेवटची स्पर्धा... मग हे क्षेत्रच सोडायचं,’ असं ठरवलंय. निकाल जाहीर होतो. त्या नव्या नटाला पहिलं बक्षीस मिळतं. सिद्धार्थ जाधव दुसरा येतो. तो त्या नव्या नटाला देवेंद्र पेम सरांच्या नव्या-कोऱ्या व्यावसायिक नाटकासाठी विचारतो. त्याच स्पर्धेत सहभागी झालेली सुनैना नावाची तरुणी नव्या नटावर अक्षरशः भाळते. थोडक्यात, बक्षिसासोबत फेम, देवेंद्र पेम आणि पहिलं प्रेम त्याला याच एकाच स्पर्धेतून मिळतं. त्याच्यासाठी ही स्पर्धा म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉइंट बनून जाते.

Loading content, please wait...