Ultra processed Food
Esakal
मुंबई – जेवताना भाजी पोळीसोबत काहीतरी चटपटीत किंवा कुरूम कुरूम हवे असा विचार करून तुम्हीही रोज वेफर्स, चिप्स, स्टिक्स असे पदार्थ खात असाल तर तुमच्या आरोग्याला याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. जगप्रसिद्ध अशा लान्सेटच्या शोधनिबंधातून हे सांगण्यात आले आहे की, अशा प्रकारे अति प्रक्रिया केलेले अन्न हे शरीरासाठी घातक असून हे अनेक मोठ्या आजारांसाठी आमंत्रण ठरू शकणारे आहे. मुख्य म्हणजे गेल्या वीस एक वर्षात भारतात अति प्रक्रिया केलेल्या या अन्नाची विक्री ही हजारो पटींनी वाढली आहे. त्यामुळे भारतासारख्या देशाला याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
लान्सेटने या विषयात तीन शोधनिबंधांची एक मालिकाच प्रसिद्ध केली असून यामध्ये जागतिक स्तरावर हे अन्न पदार्थ विकणाऱ्या ठाराविक कंपन्यांची मोनोपॉली, त्यातून होणाऱ्या चुकीच्या गोष्टी, खाणाऱ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम, त्यात असणारे घटक आदी सर्व बाबींवर प्रकाश टाकला आहे. हे सगळं आपण ‘सकाळ+’ च्या या लेखाच्या माध्यमातून समजावून घेऊया.