Premium|Study Room : अक्षांश-रेखांशांचे रहस्य; पृथ्वीवरील स्थान कसे ठरवले जाते?

Latitude and Longitude : अक्षांश आणि रेखांश यांच्या साहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान निश्चित केले जाते. उष्ण, समशीतोष्ण आणि शीत कटिबंधांचे वर्गीकरणही याच भौगोलिक निर्देशांकांवर आधारित आहे.
Latitude and Longitude

Latitude and Longitude

esakal

Updated on

लेखक : सागर रेपाळे

अक्षांश (Latitude) आणि रेखांश (Longitude) यांना भौगोलिक निर्देशांक (Geographical Coordinates) असेही म्हणतात. पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान, अंतर आणि दिशा अचूकपणे निश्चित करण्यासाठी या काल्पनिक रेषांचे जाळे वापरले जाते. अक्षांश व रेखांश हे अंश (°) मध्ये मोजले जातात. प्रत्येक अंशाचे ६० मिनिटे (') आणि प्रत्येक मिनिटाचे ६० सेकंद (") असतात.

अक्षांश म्हणजे पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे विषुववृत्तापासून (Equator) उत्तर किंवा दक्षिण दिशेतील कोनीय अंतर होय. अक्षांश रेषा विषुववृत्ताला समांतर असतात आणि समान अक्षांश असलेल्या बिंदूंना जोडणाऱ्या रेषांना समांतर रेषा (Parallels) म्हणतात. विषुववृत्त पृथ्वीचे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध असे दोन भाग करते. दोन अक्षांशांमधील सरासरी अंतर सुमारे १११ कि.मी. असते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com