

Marathi Language Promotion Strategies
esakal
नवीन भाषा शिकल्यामुळे ज्ञानाचं नवीन दालन खुलं होतं. त्यामुळे आपण अमराठी भाषिकांना मराठी शिकवून त्यांचं नुकसान नव्हे; तर फायदाच करून देत आहोत. त्यात आपला, आपल्या महाराष्ट्र राज्याचा आणि मराठी भाषेचाही फायदाच आहे.
हिंसेने कोणताही प्रश्न कायमस्वरूपी सुटत नाही... तात्पुरत्या स्वरूपात तो प्रश्न दाबला जातो आणि मग कालांतराने पुन्हा वर येतो. समस्या सुटण्यापेक्षा ती अधिक क्लिष्ट बनत जाते. हिंसा हिंसेलाच जन्म देते. सध्या चालू असलेलं इस्राईल-अमेरिका आणि इराण युद्ध हे याचं डोळ्यात अंजन घालणारं ज्वलंत उदाहरण आहे.
हिं...पण हिंसेचं हे एकच उदाहरण आहे का? तर नाही. आपल्या आजूबाजूला असे खूप प्रश्न आहेत, जे आपण हिंसेने सोडवू पाहत आहोत; पण ते सुटत नाहीत. याचा अर्थ, हिंसा हा त्यावरील उपाय नाही. जगभरात सत्ता, भूप्रदेश, नैसर्गिक संसाधने, धर्म, भाषा या घटकांवरून मोठमोठ्या प्रमाणात हिंसा झालेल्या आहेत आणि कदाचित भविष्यातही होत राहतील.