
किरांग गांधी
kirang.gandhi@gmail.com
मार्च महिना भारतात आयुर्विमा विक्रीसाठी अत्यंत गजबजलेला असतो. करबचतीची अंतिम मुदत जवळ आल्यामुळे, अनेक गुंतवणूकदार घाईघाईने विमा पॉलिसी घेतात. या घाईमध्ये ‘गॅरंटीड रिटर्न’ देणाऱ्या योजनांच्या सापळ्यात ते अडकतात. या योजना सुरक्षित, करबचतीस मदत करणाऱ्या आणि बाजाराच्या चढ-उतारांपासून मुक्त असल्याचा दावा विमा सल्लागार करतात. मात्र, यामागे असलेली वास्तविकता तुमचे लाखो रुपयांचे नुकसान करू शकते.