gas prices in 20 years
Esakal
पुणे – गॅस सिलिंडर हा असा विषय आहे जो युद्धापासून ते थेट तुमच्या घरापर्यंत जोडलेला आहे. सध्या युद्धामुळे सिलिंडरचे भाव हे थेट २९ रूपयांनी वाढले आहेत. पण गॅस सिलिंडर प्रकरणात केवळ युद्ध हा एवढाच भाग आहे का, की त्याही व्यतिरिक्त काही कारणं आहेत.
जो सिलिंडर २००६ साली २९७ रूपयांना होता तो आता थेट ८०० रूपयांवर जाऊन पोचला आहे. घरगुती गॅसची झालेली ही दरवाढ ही जवळपास २१६ टक्के आहे तर व्यावसायिक गॅसची दरवाढ ही ४७० टक्के झालेली आहे. ही इतकी मोठी भाववाढ एका दिवसात झालेली नाही. यामागे अनेक घटना आहेत, कारणं आहेत. भारताच्या ऊर्जा क्षेत्रात मोठे बदल होतायेत. पुर्वी जो ग्राहक गॅसकडे एक वस्तू म्हणून बघत होता, कोणत्या कंपनीचा गॅस घ्यायचा, तो घ्यायचा की नाही घ्यायचा, तो कधी घ्यायचा याचा निर्णय तो ग्राहकच घेत होता. पण पुढील काळात हे चित्र मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता असून आता तो वस्तूचा ग्राहक न रहाता पाईप गॅसच्या माध्यमातून कायमस्वरूपी सेवेचा ग्राहक बनतो आहे. या ऊर्जा क्षेत्राचा हा प्रवास सरकारीकडून खासगीकडे जाणारा आहे. यामध्ये देशातील बड्या कंपन्या त्यांचे हित असाही मुद्दा आहेच. हा एकूणातच विषय काय आहे आणि यात कसे आणि का बदल होतायेत हे आपण या सकाळ+ च्या विशेष लेखाच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.