

Malvani Bhasha Divas
esakal
सुरेश गोसावी - sakal.avtaran@gmail.com
मालवणी सम्राट आणि मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक अन् निर्माते अशी ओळख असलेले मच्छिंद्र कांबळी यांचा आज जन्मदिवस... विनोदी शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कांबळी यांनी मालवणी बोलीला मराठी रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात आणले. मालवणी भाषेला लोकप्रिय केले. त्यांचा जन्मदिवस काही वर्षांपासून मालवणी भाषा दिन म्हणूनही साजरा केला जात आहे. त्यानिमित्त त्यांच्या कार्याला मालवणी भाषेत मानाचा मुजरा...