मुंबई: वैद्यकीय प्रवेशासाठी देशपातळीवर घेतल्या जाणाऱ्या NEET-UG 2025 च्या निकालावर मद्रास हायकोर्टाने तात्पुरता स्थगिती आदेश दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशभरातील वैद्यकीय प्रवेशास जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये टेन्शन वाढले आहे. पण NEET-UG 2025 बाबत काही विद्यार्थी न्यायालयात गेल्याने निकालावर याचा खरोखरच परिणाम होईल का..? या पूर्वीही अशा घटना घडल्या होत्या का..? त्यावेळी न्यायालयाने काय निर्णय दिला होता? या वर्षीचा वाद काय? जाणून घेऊया 'सकाळ प्लस' च्या या लेखातून..