
Maharashtra gaming policy
esakal
मधुबन पिंगळे
महाराष्ट्र सरकारने अॅनिमेशन-गेमिंग धोरणाला नुकतीच मंजुरी दिली. गेमिंग आणि अॅनिमेशन क्षेत्राचा वेगाने विस्तार होत आहे. या क्षेत्रामध्ये नवे रोजगार निर्माण करतानाच, हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारने पावली टाकली आहेत. याच माध्यमातून मुंबईला मनोरंजन आणि पर्यटन क्षेत्राची राजधानी करण्याचा मनोदयही जाहीर करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने नुकतेच अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिअॅलिटी धोरणाला मंजुरी दिली आहे. या क्षेत्राला उद्योग आणि पायाभूत सुविधा क्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. जगभरात गेमिंग क्षेत्र वेगाने विस्तारत आहे. या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक व्हावी आणि नवे उच्चतंत्रक्षम रोजगार निर्माण व्हावेत, या दृष्टीने सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.