
शंभर वर्षांची परंपरा असलेला गणेशोत्सव आता राज्य उत्सव म्हणून साजरा केला जाणार आहे. राज्यातील हा उत्सव जगाच्या नकाशावर येताना एका वेगळ्या पद्धतीने यावा, सुनियोजित पद्धतीने येताना श्रद्धा आणि भक्ती यांचे अधिष्ठान असणारा हा सण समाजापुढे आणण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे.
त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, भजनी मंडळे, आरती मंडळे यांना पारितोषिके, सांस्कृतिक कार्यक्रम प्रबोधनपर व्याख्याने असे अनेक कार्यक्रम या उत्सवादरम्यान राज्यभरात घेतले जाणार आहेत. गणेशोत्सव हा राज्य उत्सव व्हावा म्हणून प्रयत्न करणारे राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी पांडुरंग म्हस्के यांनी केलेली बातचीत.