
हेमंत देसाई
बोलण्यासाठी वाणी आवश्यक असते, पण गप्प राहण्यासाठी वाणी आणि विवेक दोन्ही आवश्यक असतात, असे उद्गार एकदा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी काढले होते. ज्यावेळी वाणीचा वापर करायचा, तेव्हा तो सुसंस्कृतपणे आणि प्रभावीपणे केला पाहिजे, हे वाजपेयींसारख्या नेत्यांनी अनेकदा दाखवून दिले होते.
एकदा पंडित नेहरूंनी जनसंघावर टीका केली, तेव्हा अटलजी गमतीने उत्तरले, ‘नेहरूजी तुम्ही शीर्षासन करता, त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण तुम्हाला जनसंघ उलटा का दिसतो?’ हे ऐकल्यावर सारे सभागृह खदखदून हसले, पंडित नेहरूसुद्धा!