
Maharashtra Weather Update: हवामान खात्याच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात अजून १८ जूनपर्यंत असाच पाऊस पडत राहण्याची शक्यता आहे.
थोड्या विश्रांतीनंतर, शुक्रवारपासून महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पाऊस सुरू झाला. मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत शनिवारी ते रविवारी सकाळपर्यंत १९ मिमी पावसाची नोंद झाली, तर कुलाबा किनारपट्टी वेधशाळेत ३४ मिमी पावसाची नोंद झाली होती.