Premium|Study Room : महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेत नेमकं काय घडतंय?

Maharashtra SIR : महाराष्ट्रातील विशेष सखोल पुनरीक्षणामुळे मतदारयादीतील नावे आणि तपशील पुन्हा तपासले जात आहेत. नाव नसल्यास किंवा चुकीची माहिती असल्यास निर्धारित मुदतीत दावा किंवा हरकत दाखल करणे आवश्यक आहे.
Maharashtra SIR

Maharashtra SIR

esakal

Updated on: 

लेखक - अभिजित मोदे

महाराष्ट्रातील एसआयआर प्रक्रियेंतर्गत प्रसिद्ध झालेली मसुदा मतदारयादी (Draft Electoral Roll) ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या यादीत एकूण सुमारे ९.७८ कोटी मतदारांची नावे आहेत, जी महाराष्ट्राची मूळ मतदारसंख्या मानली जाते. मात्र, या मसुदा यादीत अंदाजे १.२२ कोटी मतदारांच्या नावांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे त्यांची नावे पुन्हा तपासण्यात येत आहेत. यामध्ये ६२.४८ लाख मतदारांच्या नातेसंबंधांच्या माहितीत चुका आहेत, तर ५९.७५ लाख मतदारांना मागील यादीतील नातेसंबंधांशी जोडता आलेले नाही. ज्यांचे नाव या मसुदा यादीत नाही किंवा ज्यांच्या नावात चुका आहेत, त्यांनी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावे किंवा आक्षेप दाखल करावेत, अन्यथा त्यांची नावे अंतिम यादीतून वगळली जाऊ शकतात. ही मसुदा यादी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आणि स्थानिक निवडणूक कार्यालयांमध्ये तपासण्यासाठी उपलब्ध आहे.

एसआयआर म्हणजे काय?

एसआयआर म्हणजे Special Intensive Revision, मराठीत विशेष सखोल पुनरीक्षण. ही एक अशी मोहीम आहे, ज्यामध्ये निवडणूक आयोगाचे अधिकारी (BLO – बूथ लेव्हल ऑफिसर) घरोघरी जाऊन मतदारांची माहिती तपासतात, चुका दुरुस्त करतात आणि नवीन मतदारांची नावे जोडतात. याचा मुख्य उद्देश असा आहे की, मतदारयादीत फक्त पात्र नागरिकांचीच नावे असावीत आणि कोणत्याही चुकीमुळे कोणाचा मतदानाचा हक्क हिरावला जाऊ नये.

एसआयआर का राबवली जाते?

मतदारयादी ही लोकशाहीचा पाया आहे. जर या यादीत चुका असतील, तर निवडणुकीत गोंधळ होऊ शकतो. काही लोकांची नावे वगळली जाऊ शकतात किंवा एकाच व्यक्तीची नावे एकापेक्षा जास्त ठिकाणी असू शकतात. एसआयआर मुळे अशा चुका शोधल्या जातात आणि दुरुस्त केल्या जातात. यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक न्याय्य आणि पारदर्शक बनते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com