

Marathi Father Son Conversation
esakal
किशोर बळी-sakal.avtaran@gmail.com
‘‘हॅलो गोल्या... कुठी हायेस बे?’’
‘समुद्राच्या काठावर हाव पोप्पा मी.’
‘‘तथी का मासोया धराले गेला का बे भोपयसुत्या?’’
‘मित्रासंगं हाव पोप्पा मी.’
‘‘मित्र व्हय का मैतरीन व्हय आम्हाले काय ठाऊक होते बे अथी बोंदरखेळ्यात हेंबाळथुतऱ्या?’’
‘शिव्या काऊन देऊन राह्यले हो? सरके बोला ना!’
‘‘मरसान ना सायाचेहो तथी हराममौतीनं! बातमीबी येनार नाई टीव्हीवर... आमी बसू अथी बोंबलत!’’
‘टेंशन नका घेऊ ना पोप्पा तुम्ही. मी काय लाहान लेकरू राह्यलो काय आता?’
‘‘जास्त शायना झाला काय तू तथी मुंबईत जाऊन? फोन काऊन नाई लागून राह्यला तुह्या?’’
‘नेटवर्क प्रोब्लेम हाये पोप्पा.’
‘‘अबे, तीन घंट्यापासून फोन लावून लावून बेदम झालो ना मी इकळे.’’
‘रेंजच नाई ना! अजिबातच फोन लागत नाई.’
‘‘मंग, आता कसा काय लागला बे?’’
‘रूमवर होतो, आता चौपाटीवर आलो. आता रेंज आली.’
‘‘लय रेंजच्या भाईर चालला गोल्या तू!’’
‘माह्या हातात हाये का हो पोप्पा ते?’