

Marathi Font History mudraksharvidya book girish dalvi iit bombay
E sakal
Beyond the Font: What IIT Professor Girish Dalvi's Book Reveals About Devanagari Typography
आपण दररोज हजारो अक्षरं पाहतो. मोबाईलच्या स्क्रीनवर, वर्तमानपत्रात, पुस्तकात, जाहिरातीत, सरकारी फलकांवर, सोशल मीडियावर. मराठी वाचताना ‘ळ’ कसा दिसतो, ‘ल’चं रूप कसं आहे किंवा एखादा फाँट आपल्याला सहज आणि दुसरा विचित्र का वाटतो, याचा आपण फारसा विचार करत नाही. पण आपण पाहतो ते अक्षर नेमकं कुणी तयार केलं? त्याची रचना कशी ठरली? त्यामागे कला आहे की विज्ञान? आणि मराठी अक्षरांचं रूप हिंदीपेक्षा वेगळं का दिसतं?
याच प्रश्नांच्या मागे असलेल्या जगाची ओळख करून देणारं ‘मुद्राक्षरविद्या : सिद्धांत आणि व्यवहार’ हे पुस्तक आयआयटी मुंबईच्या आयडीसी स्कूल ऑफ डिझाइनचे प्रा. गिरीश दळवी यांनी लिहिलं आहे. याच पुस्तकाबद्दल आज सकाळ प्लसमध्ये.