Premium|Marathi Ghazal : दुःख माझे लहानसे झाले!

Ghazal Poetry : गझल ही शब्द, स्वर आणि भावनांची अद्वितीय गुंफण असून, प्रत्येक शेर रसिकाच्या अनुभवविश्वाशी जोडत मानवी सुख-दुःखांचा संवाद साधतो आणि अर्थाच्या नव्या शक्यता उलगडतो.
Ghazal Poetry

Ghazal Poetry

esakal

Updated on

भीमराव पांचाळे - sakal.avtaran@gmail.com

गझल म्हणजे शब्द, स्वर आणि भावनांचं अद्वितीय रसायन. कधी ती अंतर्मुख करते... कधी काळजाचा ठाव घेते. प्रसिद्ध गझलकारांच्या गझला आजही आपल्याशी संवाद साधतात. अशाच काही गझलांतील काव्यरूप शब्दबद्ध करणार आहेत, गझलनवाज भीमराव पांचाळे आजपासून सुरू होत असलेल्या पाक्षिक सदरातून...

रसिकांशी गझलच्या मार्फत संवाद साधण्याचा झकास योग आला आहे... शुक्रिया सकाळ!

‘सुखन अज माशूक गुफ्तन’...

गझलच्या या आद्य परिभाषेतच या संवादाचे सूचन व प्रतिपादन आहे. आरंभी या व्याख्येचे ‘आपल्या प्रिय व्यक्तीशी हितगूज’ एवढेच म्हणणे असले तरी गझल यातून खूप लवकर बाहेर पडली आणि वैश्विक झाली... मानवी सुख आणि दुःखाच्या जाणिवांचा हुंकार झाली.

गझलच्या प्रत्येक शेराला उचंबळून दाद मिळते ती यामुळेच! शेराचा आशय रसिकाच्या जगण्याशी कुठेतरी रिलेट होतो आणि आपसूक दाद येते - ‘व्वा... क्या बात है!’

मजरूह साहेब म्हणतात -

‘गझलचा शेर आपला अर्थ कधीच सांगत नाही; तर अर्थाची केवळ दिशा दाखवतो; ज्याचा अर्थ त्याने

काढायचा असतो.’

Ghazal Poetry
Gordon Hall : भारतातील सामाजिक क्रांतीचे प्रणेते गॉर्डन हॉल यांची कहाणी त्यांच्या नातवाच्या शब्दांत
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com