

Think and Grow Rich
esakal
नववर्षाला (२०२६) नुकतीच सुरूवात झाली आहे. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे संकल्प करत असतात. पण उत्साहाच्या भरात सुरू केलेले संकल्प पूर्णत्वास जात नाहीत, असा अनेकांचा अनुभव असतो. त्यामुळे आपल्या जीवनातील गरजा, इच्छा आणि उद्दिष्टांचा साकल्याने विचार करून, शिस्तबद्ध आणि चिकाटीने कामास सुरुवात केली तर कठीण वाटणारे उद्दिष्ट नक्कीच साध्य करता येऊ शकते. यानिमित्ताने Think and Grow Rich हे नेपोलियन हिल यांनी लिहिलेले पुस्तक सर्वांनाच प्रेरणादायी ठरेल.
ot failure but low aim is crime’ या उक्तीचा संदर्भ अनेक वर्षे दिला जातो. हे वाक्य आपल्याला सांगते, की अपयश येणे हा काही गुन्हा किंवा लाजिरवाणी गोष्ट नाही. प्रयत्न करताना अपयश येऊ शकते, ते नैसर्गिक आहे. मात्र, अत्यंत छोटे किंवा मर्यादित उद्दिष्ट वा ध्येय ठेवणे हे चुकीचे आहे. जेव्हा एखादा माणूस स्वतःच्या क्षमतेपेक्षा खूपच कमी उद्दिष्ट वा ध्येय (टार्गेट किंवा गोल) ठेवतो, तेव्हा तो स्वतःच्या संधी, कौशल्ये आणि वैयक्तिक प्रगतीला स्वतःच मर्यादित घालतो. मोठे उद्दिष्ट किंवा ध्येय ठेवले आणि समजा त्यात अपयश आले तरी एक अनुभव मिळतो, त्यातून शिकायला मिळते आणि पुढे जाण्याची दिशाही मिळू शकते.