Premium|Maternity Insurance Policy : वाढत्या प्रसूती खर्चात मातृत्व विमा का ठरतो आर्थिक आधार?

Benefits of Maternity Insurance : वाढते सिझेरियन, उशिरा होणारे विवाह आणि प्रसूतीवरील वाढता वैद्यकीय खर्च लक्षात घेता मातृत्व विमा पॉलिसी आर्थिक संरक्षण देणारा महत्त्वाचा पर्याय ठरत असून, योग्य नियोजनासाठी त्याचे फायदे जाणून घेणे आवश्यक आहे.
Maternity Insurance Policy

Maternity Insurance Policy

esakal

Updated on

सुधाकर कुलकर्णी - sbkulkarni.pune@gmail.com

बाळाचे आगमन हा कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा क्षण असतो. मात्र, आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विवाह उशिरा होत आहेत. करिअर आणि आर्थिक स्थैर्य मिळेपर्यंत मुलाचा विचार पुढे ढकलला जातो. परिणामी, साधारणतः वयाच्या ३०-३२ वर्षांनंतर पहिल्या अपत्याचा विचार केला जातो (विशेषतः शहरी भागात). वाढत्या वयानुसार नैसर्गिक प्रसूती होण्याची शक्यता कमी होते आणि सिझेरियन प्रसूतीची शक्यता वाढते. २०२४-२५ च्या आकडेवारीनुसार, भारतात सिझेरियन प्रसूतीचे प्रमाण सुमारे २७.४६ टक्के आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात हे प्रमाण आणखी वाढू शकते. यामुळे प्रसूतीपूर्व, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतरचा वैद्यकीय खर्च मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विशेषतः शस्त्रक्रियेने प्रसूती झाल्यास किंवा गर्भधारणेदरम्यान काही गुंतागुंत निर्माण झाल्यास खर्च अधिक वाढतो. अशा परिस्थितीत मातृत्व विमा पॉलिसी घेऊन या खर्चाची योग्य तरतूद करता येते.

मातृत्व विमा पॉलिसीचे प्रकार

मातृत्व विमा पॉलिसी पुढील दोन प्रकारे घेता येते-

१. स्वतंत्र (स्टँड-अलोन) पॉलिसी

२. विद्यमान मेडिक्लेम पॉलिसीसोबत रायडर किंवा ॲड-ऑन स्वरूपात

मातृत्व विमा पॉलिसीचे फायदे

ही पॉलिसी पुढील खर्चांची भरपाई (अटी व शर्तींनुसार) करते-

१. गरोदरपणातील वैद्यकीय खर्च

२. प्रसूतीचा खर्च (नैसर्गिक किंवा सिझेरियन)

३. प्रसूतीनंतरचा खर्च

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com