मुंबई : देशातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला हादरवून टाकणारा एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. प्रोजेक्ट ग्रीन नावाने सीबीआयने केलेल्या विशेष कारवाईत वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळवून देण्यासाठी सुरू असलेले कोट्यवधी रुपयांचे रॅकेट यातून समोर आले आहे. या प्रकरणात एका स्वघोषित धर्मगुरू आणि माजी विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) प्रमुख यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.
हा घोटाळा केवळ एका राज्यापुरता मर्यादित नसून छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली यांसारख्या अनेक राज्यांमध्ये त्याची पाळेमुळे पसरली आहेत. हा घोटाळा नेमका काय?, तो कसा केला गेला, या विषयी नेमकी सध्या काय माहिती समोर आली आहे, यामध्ये किती जणांची नावे आहेत, यातील मोठे मासे कोणते या सगळ्याची माहिती जाणून घेऊया सकाळ प्लस च्या या विशेष लेखातून..