Satya nadela and PM modi
Esakal
पुणे - मायक्रोसॉफ्ट या जागतिक पातळीवरील कंपनीने आशिया खंडातील सर्वात मोठी गुंतवणूक ही भारतात केली आहे. मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी दोनच दिवसांपूर्वी भारतात १७.५ बिलियन म्हणजेच १.४६ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक केली असल्याचे जाहीर केले. जानेवारी २०२५ मध्ये मायक्रोसॉफ्टने केलेल्या ३ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीपेक्षा ही गुंतवणूक पाचपट मोठी जास्त आहे. ही गुंतवणूक भारतात चार टप्प्यांमध्ये केली जाणार आहे. गेल्या महिन्यात गुगल, अदानी ग्रुप आणि एअरटेल यांनी व्हिजाग AI हबसाठी $15 अब्जची गुंतवणूक जाहीर केली होती. त्यानंतर आता इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी ही गुंतवणूक.. पण याने काय साध्य होणार..?
भारतीयांना काय मिळणार..? या गुंतवणुकीमागचा सरकारचा हेतू काय आहे, यातून भारतीय बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल का की, यामुळे केवळ उद्योगपतींनाच फायदा होईल, आर्टिफिशियल इंटेलिन्समधील या गुंतवणुकीने भारत एआयमध्ये मोठी क्रांती करेल का..? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या 'सकाळ+' मधील लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.