

Business Ethics and Values
esakal
व्यवसाय आहे म्हटल्यावर नफा कमावलाच पाहिजे. घर जाळून कोणी कोळशाचा व्यवसाय करत नाही; परंतु निव्वळ नफ्यासाठीच व्यवसाय करणं, त्यासाठी व्यावसायिक नीतिमत्ता बाजूला ठेवून ग्राहकांना कात्रीत पकडणं याला व्यवसाय म्हणता येईल का? ही ग्राहकांची फसवणूक नाही का?
मोरच्याला कचाट्यात पकडणं आणि त्याच्या हतबलतेचा फायदा करून घेणं ही यशस्वी व्यवसायाची व्याख्या बनत चालली आहे का?
माणूस प्रगत होऊ लागला तसं त्याला व्यवसायासाठी वेगवेगळी क्षेत्रं खुली होऊ लागली. मानवाची प्रगती होऊ लागली तशी त्याला वेळेची कमतरता भासू लागली. त्याचा वेळ वाचावा म्हणून सेवा पुरवणारे अनेक व्यवसाय सुरू झाले. तुमच्या वतीने आम्ही तुमचं काम करू किंवा आम्ही सेवा देऊन तुमचा वेळ वाचवू, अशा स्वरूपाचे व्यवसाय... एका व्यवसायाची कमतरता भरून काढण्यासाठी दुसरा व्यवसाय निर्माण झाला. सेवा पुरवणाऱ्या व्यवसायाला, सेवा पुरवणारा नवीन व्यवसाय निर्माण झाला. ही साखळी वाढतच गेली आणि आपल्या आजूबाजूला व्यवसायांचं एक जाळं निर्माण झालं.