Premium|Muhurat Trading 2026 Date and Time : दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगमागे काय आहे अर्थशास्त्र? ५० वर्षांची परंपरा आणि संपत्तीनिर्मितीचे गणित

Muhurat Trading History and Sensex Performance : दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगची परंपरा, सेन्सेक्सची ऐतिहासिक वाटचाल, सणासुदीतील अर्थव्यवस्थेची गती आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत कम्पाउंडिंगचे महत्त्व समजून घ्या.
Muhurat Trading History and Sensex Performance

Muhurat Trading History and Sensex Performance

esakal

Updated on: 

निरंजन दांडेकर - niranjandandekar2007@gmail.com

दिवाळी हा प्रकाशाचा आणि नव्या आशांचा सण. भारतीय शेअर बाजारातही या उत्सवाला आर्थिक परंपरेची जोड मिळते ती ‘मुहूर्त ट्रेडिंग’च्या माध्यमातून. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी होणारे हे विशेष सत्र केवळ एका तासाच्या व्यवहारापुरते मर्यादित नसून, त्यामागे दीर्घकालीन गुंतवणूक, आर्थिक शिस्त आणि संपत्तीनिर्मितीचा विचार आहे. २०२६ मधील ‘मुहूर्त ट्रेडिंग’च्या पार्श्वभूमीवर, या परंपरेचा इतिहास, दिवाळीच्या काळातील अर्थव्यवस्थेची गती, ‘सेन्सेक्स’ची वाटचाल आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी महत्त्वाची धोरणे समजून घेणे आवश्यक आहे.

दिवाळी हा जसा दिव्यांचा आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचा सण आहे; तसाच तो आर्थिक समृद्धीचा आणि नव्या आशांचाही उत्सव आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील दलाल स्ट्रीटवर दिवाळीचा हा उत्साह ‘मुहूर्त ट्रेडिंग’च्या रूपात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. येत्या दिवाळीत, म्हणजेच २०२६ च्या ‘मुहूर्त ट्रेडिंग’साठी बाजारात गुंतवणूकदारांचा उत्साह पाहायला मिळेल. यंदा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ‘मुहूर्त ट्रेडिंग’ रविवार, ता. आठ नोव्हेंबर २०२६ रोजी, होणार आहे. शेअर बाजाराकडून या विशेष सत्राची अधिकृत वेळ जाहीर केली गेली आहे. दरवर्षीप्रमाणे हे सत्र लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर संध्याकाळी न होता यंदा दुपारी होणार आहे. परंतु, ‘मुहूर्त ट्रेडिंग’ हे केवळ एक तासाचे शेअर बाजारातील व्यवहाराचे सत्र नाही. या परंपरेमागे भारतीय अर्थव्यवस्थेची गती, सणासुदीच्या काळातील देशांतर्गत उपभोगाचे अर्थशास्त्र आणि दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीचे, अर्थात ‘कम्पाउंडिंग’चे गणित दडलेले आहे. या लेखात आपण ‘मुहूर्त ट्रेडिंग’चा ५० वर्षांपेक्षा जुना वारसा आणि ‘सेन्सेक्स’ची गेल्या १५ वर्षांतील ऐतिहासिक वाटचाल समजून घेणार आहोत.

Loading content, please wait...