

Mumbai Municipal Corporation
esakal
डॉ. अरुण सावंत, माजी प्र-कुलगुरू
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांचा धुरळा आता खाली बसला आहे. अनेक वर्षांनंतर सत्तेवर आलेल्या लोकप्रतिनिधींना आता निवडणूक प्रचार काळात दिलेल्या आश्वासनांची सतत आठवण देत राहावे लागणार आहे. मुंबईची हवा प्रदुषित झाली आहे. प्राथमिक ते उच्चशिक्षणाचा दर्जा खालावत चालला आहे. बेरोजगारी, महागाई या पारंपरिक प्रश्नांसोबतच अनेक नवे प्रश्न या महानगरात तयार झाले आहेत. या प्रश्नांना या लोकप्रतिनिधींना व त्यांच्या पक्षाला भिडावे लागेल. मुंबईकरांना चांगले राहणीमान मिळण्याची अपेक्षा इथला सर्वसामान्य माणूस बाळगून आहे.