
दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई तुंबली आणि तुंबई झाली. फरक इतकाच की जून महिन्याऐवजी ती मे महिन्यातच झाली. यंदा दक्षिण मुंबईत पाणी भरलं मागील वर्षी चौपाटीवरून समुद्राचं पाणी आत आलं होतं. ते पार चौपाटी पार करून असलेल्या गिरगाव भागात पोहोचलं होतं. दरवर्षी पाणी इंचाइंचाने पुढेच सरकताना दिसत आहे. नक्की कारण काय? माधवराव चितळे समितीच्या शिफारसी, नालेसफाईची आश्वासनं, ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाचं काय झालं?