

Mumbai Art Deco Buildings
Sakal
दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्ह आणि ओव्हल मैदान परिसरातील आर्ट डेको इमारती म्हणजे मुंबईच्या आधुनिकतेची आणि सौंदर्याची जिवंत ओळख. १९२५ मध्ये पॅरिसमध्ये भरलेल्या एका जागतिक प्रदर्शनीतून आर्ट डेकोची संकल्पना पहिल्यांदा जगासमोर आली. त्यानंतर जगभर पसरत ती १९२५ ते १९३० च्या दरम्यान मुंबईपर्यंत पोहोचली. आज आर्ट डेको शैलीला १०० वर्षे झाली आहेत.