

Naldurg Fort Maharashtra
esakal
डॉ. श्रीमंत कोकाटे - shrimantkokate1@gmail.com
महाराष्ट्राच्या इतिहासात जसे डोंगरी दुर्गांचे, सागरी दुर्गांचे महत्त्व आहे तसेच भुईकोटांचेदेखील महत्त्वाचे स्थान आहे. राजकीय, सामाजिक, स्थित्यंतराचे ते साक्षीदार आहेत. भूतकाळ आणि वर्तमानकाळाला जोडणारे महत्त्वाचे भौतिक संदर्भ म्हणजे गडकोट आहेत. गडकोट आपणाला इतिहास समजावून सांगतात. इतिहासाची सत्यता पाहण्यासाठी गडकोट हे आरसे आहेत. प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहास कथन करण्यासाठी गडकोट आपणाला मार्गदर्शन करतात. त्यामुळे गडकोट हे केवळ दगडधोंडे नाहीत. ते जीर्ण आणि पडझड झालेल्या वास्तू नाहीत; तर ते प्रेरणास्थळं आहेत. इतिहास जिवंत करून तो कथन करण्यासाठी गडकोट आपणाला मोलाचे सहकार्य करतात. त्यामुळे आपण गडकोट आवर्जून पाहिले पाहिजेत. ते आपणाला इतिहास सांगतात. ते आपणाला ऊर्जा देतात. बौद्धिक, मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी गिर्यारोहण खूप अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात गडकोटांचे मोलाचे योगदान आहे. इतिहास हा नेहमी भूगोलाच्या मंचावर घडत असतो. प्राचीन आणि मध्ययुगाचा इतिहास गडकोटांनी घडविला. त्यापैकी महत्त्वाचा भुईकोट आहेे नळदुर्ग!