अनिल कवडे
केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा समिती’ने तयार केलेले ‘राष्ट्रीय सहकार धोरण २०२५’ नुकतेच स्वीकारण्यात आले. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली सप्टेंबर २०२२मध्ये ४८ सदस्यीय ‘राष्ट्रीय सहकार धोरण मसुदा समिती’ स्थापन करण्यात आलेली होती.
देशातील विविध राज्यांतील सहकार क्षेत्रातील संघीय संस्थांचे प्रतिनिधी, केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावरील संबंधित मंत्रालयीन विभागांचे प्रतिनिधी, सहकार क्षेत्राशी निगडित तज्ज्ञ यांच्याबरोबर १७ बैठकांच्या आणि ४ विभागीय कार्यशाळांच्या माध्यमातून विचार विनिमय केलेला आहे.