
केंद्र सरकार लवकरच राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती मार्गांसाठी वार्षिक आणि आजीवन टोल पास सुरू करण्याचा विचार करत आहे.
त्यामुळे टोल नाक्यांवरील वाहतूक कोडी टळेल आणि नागरिकांनाही हे किफायतशीर होईल, असे सरकारचे म्हणणे आहे.
पण मग राज्य महामार्गांचं काय?
एकदा पास काढल्यावर खासगी चारचाकी गाड्यांना कुठल्याच कोणताच टोल भरावा लागणार नाही का?
सरकारच्या मानण्यानुसार, यामुळे टोल नाक्यांवरील गर्दी कमी होईल, वाहतूक कोंडी टळेल. शिवाय नागरिकांना एकदाच ठराविक शुल्क भरून मग दीर्घकाळासाठी टोलमुक्त प्रवास करता येईल.
यामुळे वाहतूक कोंडी कशी बरं टळणार आहे?