Sea level rise
Esakal
पुणे – आपल्यातील अनेकांसाठी समुद्राची पाणीपातळी, समुद्र सपाटीपासून शहराची उंची असे शब्द हे केवळ भुगोलाच्या पुस्तकापुरतेच मर्यादित असतील. पण ते प्रत्यक्ष मानवी जीवनावर कसा परिणाम करतात हे पाहण्याची वेळ आता आली आहे.
Nature या जागतिक पातळीवरच्या सायन्स जर्नलमध्ये नुकताच एक अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला आहे. या अभ्यासानुसार जगातील सर्व समुद्रांची पाणीपातळी शास्त्रज्ञांनी यापुर्वी वर्तवलेल्या अंदाजापेक्षाही अधिक वेगाने वाढते आहे. यामुळेच येत्या काही वर्षात मुंबईसह जगातील अनेक शहरं ही पाण्याखाली जाऊ शकत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. मुख्य म्हणजे शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हे आपण उपाययोजनांनी कमी करू शकत असलो तरी हे होणे आता अपरिहार्य आहे.
हा नव्याने केलेला अभ्यास नेमका काय आहे, यापुर्वी या विषयात काय संशोधन झाले आहे, यापुर्वीचा अंदाज आणि सद्यपरिस्थिती यात कसा फरक आहे, भारतातील कोणत्या शहरांना याचा धोका होऊ शकतो, पाणीपातळी वाढली तर नेमका बदल काय होणार, शास्त्रज्ञांनी यावर सुचवलेले उपाय कोणते, ते उपाय खरंच करणं शक्य आहे का.. हा सगळा विषय जाणून घेऊया सकाळ+ च्या या विशेष लेखाच्या माध्यमातून.