Premium|Study Room : स्वयंसेवी संस्थांसाठी परकीय निधी; संधी, नीतिमत्ता आणि देशहिताचा समतोल महत्त्वाचा

International Funding for NGOs : आंतरराष्ट्रीय निधीमुळे स्वयंसेवी संस्थांना सामाजिक उपक्रमांना गती मिळते; मात्र पारदर्शकता, नीतिमत्ता, उत्तरदायित्व आणि देशहित जपत निधीचा वापर करणे तितकेच आवश्यक ठरते.
International Funding for NGOs

International Funding for NGOs

esakal

Updated on

लेखक : अभिजित मोदे

भारतामध्ये अनेक स्वयंसेवी संस्था, म्हणजेच एनजीओ, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, पर्यावरण आणि आपत्ती निवारण अशा क्षेत्रांत महत्त्वाचे काम करतात. या कामासाठी त्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय निधी मिळतो. आंतरराष्ट्रीय निधी उपयुक्त असतो, कारण त्यातून मोठ्या प्रमाणावर सामाजिक कामे करता येतात. पण असा निधी घेताना नीतिमत्ता, पारदर्शकता आणि देशहित या गोष्टींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय निधीचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय निधीमुळे एनजीओंना आर्थिक बळ मिळते. अनेक वेळा स्थानिक साधने अपुरी पडतात, तेव्हा परकीय मदत सामाजिक प्रकल्प चालू ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. अशा निधीमधून संशोधन, प्रशिक्षण, आरोग्य सेवा, आपत्ती मदत आणि दुर्बल घटकांसाठी विशेष उपक्रम राबवता येतात. त्यामुळे समाजातील अनेक समस्यांवर जलद आणि व्यापक काम करणे शक्य होते.

नैतिकतेचा प्रश्न

आंतरराष्ट्रीय निधी उपयुक्त असला तरी त्याच्याशी काही नैतिक प्रश्न जोडलेले असतात. निधी देणाऱ्या संस्थेचे उद्देश आणि एनजीओचे उद्देश यांच्यात सुसंगती असावी. जर निधीच्या बदल्यात कोणत्याही देशविरोधी, राजकीय किंवा वादग्रस्त भूमिकेला प्रोत्साहन दिले जात असेल, तर तो गंभीर नैतिक प्रश्न ठरतो. एनजीओने समाजसेवा हेच केंद्रस्थानी ठेवले पाहिजे. बाह्य दबावाखाली काम करू नये.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com