Premium| Bihar Elections 2025: बिहारमध्ये वादळाआधीची शांतता

Nitish Kumar: बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने रणनिती आखायला सुरुवात केली आहे. नितीशकुमार यांच्यावर विश्वास ठेवायचा की नवा चेहरा द्यायचा, या संभ्रमात भाजप आहे.
Nitish Kumar
Nitish Kumaresakal
Updated on

उज्ज्वलकुमार

उत्तर भारतातील सगळ्या राज्यात सत्तेवर येऊन आपला मुख्यमंत्री या पक्षाने पाहिला. पण बिहारमध्ये ते शक्य झाले नव्हते. यावर्षी आॅक्टोबर-नोव्हेंबरच्या सुमारास होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणूक जिंकून आपला मुख्यमंत्री बघण्याची भाजपला घाई झाली आहे. भाजपने बिहारमध्ये ‘सौगात ए मोदी’ सारख्या विविध उपक्रम-प्रयोगांची पेरणी आतापासूनच सुरू केली आहे. प्रमुख विरोधक लालूंच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला पराभूत करण्यासोबतच सहकारी मित्र पक्ष असलेल्या संयुक्त जनता दल व नितीशकुमार यांनाही रोखण्यासाठीचे अंतर्गत प्रयत्न चालू आहेत. त्यासाठी केंद्रीय सत्तेचा वापरही सुरू झाला आहे. त्यामुळे निवडणुकीआधी अनेक छोटी-मोठी वादळे आताच अनुभवायला मिळणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com