Premium|NSE IPO : एनएसईचा बहुचर्चित आयपीओ अंतिम टप्प्यात; गुंतवणूक करण्यापूर्वी स्टॉक एक्स्चेंजची निर्मिती आणि भूमिका समजून घ्या

NSE IPO Valuation : बहुचर्चित नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या आयपीओची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सेबीकडे डीआरएचपी सादर झाल्याने किंमतपट्टा, मूल्यांकन आणि गुंतवणूकदारांच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
NSE IPO Valuation

NSE IPO Valuation

esakal

Updated on

नंदिनी वैद्य - nandineevaidya@yahoo.com

मागील बरीच वर्षे येणार... येणार... असे म्हणत, ‘कभी हाँ, कभी ना’ करत असलेला नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात ‘एनएसई’चा बहुचर्चित ‘आयपीओ’ अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन ठेपला आहे. ‘आयपीओ’च्या परवानगीसाठी ‘एनएसई’ने ‘सेबी’कडे ‘ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्ट्स’ (डीआरएचपी) सादर केलेले असून, त्यानुसार लवकरच हा ‘आयपीओ’ बाजारात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वांत महत्त्वाची बाब ही असेल, की या ‘आयपीओ’साठी किती किंमतपट्टा जाहीर होईल आणि कशा प्रकारचे मूल्यांकन असेल ते!

भारतीय शेअर बाजार ज्या संस्थेशिवाय काम करूच शकत नाही, समर्पकपणे बोलायचे झाले तर जशी इंजिनाशिवाय गाडी पळू शकत नाही अगदी तशीच भूमिका कॅश, डेरिव्हेटीव्हज् व्यवहारांच्या बाबतीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात ‘एनएसई’ पार पाडत आहे, इतके त्याचे महत्त्व आहे. आपल्या अर्थव्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाची अशी ही संस्था आहे आणि म्हणूनच या संस्थेची आगामी प्राथमिक समभाग विक्री म्हणजेच ‘आयपीओ’ बहुचर्चित ठरलेला आहे.

आता ‘आयपीओ’ आणि त्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुक असलेले गुंतवणूकदार यांना सांगायचे झाले, तर जसे कोणतेही काम परिणामकारक आणि कुशलतेने करायचे झाले तर त्याच्या उत्तम नियोजनात त्याच्या यशाचे रहस्य दडलेले असते, अगदी त्याच पद्धतीने वाचकांना या ‘एनएसई’च्या आगामी महत्त्वपूर्ण पब्लिक इश्युसंदर्भात योग्य माहिती आधीच मिळाली तर निर्णय घेणे सोयीस्कर ठरेल, अगदी त्यासाठीच हा लेखनप्रपंच! एखाद्या विषयाची सखोल माहिती मिळवायची झाली तर मुळातून त्याचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. शेअर बाजारात असणाऱ्या प्रत्येकाच्या तोंडी अनेकदा नॅशनल स्टॉक ‘एक्स्चेंज’ हा शब्द आलेला असतो; पण मुळात खरोखरच अशा ‘एक्स्चेंज’ची निर्मिती का केली जाते, हे समजून घेणे योग्य ठरेल.

NSE IPO Valuation
Premium|Study Room : आयपीओचा वाढता ट्रेंड; फ्रेश इश्यू, OFS, DRHP ते ग्रे मार्केट प्रीमियमपर्यंत गुंतवणूकदारांसाठी मार्गदर्शक विश्लेषण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com