

OpenAI
esakal
वॉल स्ट्रीट म्हणजे अमेरिकेतील मोठी आर्थिक बाजारपेठ आणि जगभरातील बँकिंगचं केंद्र. आता या वॉल स्ट्रीटवर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ने एक मोठा 'हल्ला' करण्याची तयारी केली आहे. या गुप्त मोहिमेचं नाव आहे 'प्रोजेक्ट मर्क्युरी' आणि यामागे आहे ChatGPT बनवणारी कंपनी OpenAI!
या मोहिमेचा ठळक परिणाम होणार आहे तो म्हणजे कनिष्ठ बँकर्स आणि त्यांच्या नोकऱ्यांवर. तो कसा? हा प्रोजेक्ट नेमका आहे काय? आणि यामुळे भविष्यात काय बदल घडतील? जाणून घेऊयात 'सकाळ प्लस'च्या या लेखातून...
OpenAI, म्हणजे तीच कंपनी जी लोकप्रिय ChatGPT बनवते, तिने आता थेट इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि कन्सल्टिंगच्या जगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या 'प्रोजेक्ट मर्क्युरी'साठी त्यांनी Morgan Stanley, JP Morgan Chase आणि Goldman Sachs अशा मोठ्या बँकांमधून शंभरहून अधिक माजी बँकर्स आणि सल्लागारांना कामावर ठेवलं आहे. या माजी बँकर्सना आता त्यांच्या जुन्या कामापेक्षा खूप जास्त, तासाला सुमारे १५० डॉलर्स म्हणजे जवळपास १२,५०० रुपये मिळत आहेत. पण ते आता जुनं काम करत नाहीयेत; तर ते AI सिस्टीमला प्रशिक्षण देत आहेत.