Premium|Oracle Layoffs : एका ईमेलने संपली नोकरी: AI युगात IT इंजिनिअरचे भविष्य

IT Sector Job Cuts India : ओरॅकल कंपनीने एआय विस्तारासाठी एकाच रात्रीत ३०,००० कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला असून, भारतीय आयटी क्षेत्रातील ही महाभयंकर नोकरकपात पारंपरिक आउटसोर्सिंग मॉडेल संपल्याची आणि एआय युगाच्या आगमनाची धोक्याची घंटा वाजवणारी ठरली आहे.
IT Sector Job Cuts India

IT Sector Job Cuts India

esakal

Updated on

३१ मार्च २०२६. सकाळचे ६ वाजले. Oracle कंपनीत काम करणाऱ्या हजारो इंजिनिअर्सच्या स्क्रीनवर एक थंड, यांत्रिक ईमेल येऊन धडकली, "आजचा दिवस तुमचा शेवटचा कामाचा दिवस आहे." HR चा फोन नाही, मॅनेजरची सूचना नाही. अनेक वर्षांचं करिअर केवळ एका क्षणात संपलं.

नेमकं काय घडलं?

Oracle ने आपल्या इतिहासातील सर्वात मोठी नोकरकपात केली. त्यांनी जगभरातल्या २०,००० ते ३०,००० कर्मचाऱ्यांना काढलं असल्याचा अंदाज आहे, जे एकूण कमर्मचारी संख्येच्या सुमारे १८% आहे. त्यापैकी १२,००० भारतातले कर्मचारी होते. Oracle च्या भारतीय कर्मचाऱ्यांपैकी तब्बल ४०% एकाच झटक्यात काढले. कामावरून काढलेल्या लोकांमध्ये इंजिनिअर्स, सॉफ्टवेअर आर्किटेक्ट्स, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर्स, ERP तज्ज्ञ आणि cloud infrastructure व्यावसायिक यांचा समावेश होता.

Oracle ने हे पाऊल त्यांच्या AI डेटा सेंटर्सच्या महागड्या विस्तारासाठी उचललं. विश्लेषकांच्या मते या नोकरपकपातीमधून कंपनीला $८ ते $१० अब्ज डॉलर्सचा कॅश फ्लो मिळेल. जो GPU clusters, cloud infrastructure आणि मोठ्या ग्राहकांसाठी डेटा सेंटर्स उभारण्यासाठी वापरला जाईल.

ह्यात एक विरोधाभास असा की Oracle च्या गेल्या तिमाहीत निव्वळ नफा ९५% वाढून $६.१३ अब्ज झाला होता. ही कंपनी आर्थिक संकटात नव्हती. तरीही तर ती AI इन्फ्रास्ट्रक्चरवर प्रचंड मोठी गुंतवणुक करण्यासाठी त्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com