facebook honey trap story
facebook honey trap story

फेसबुकवरच्या पाकिस्तानी विष कन्या भाग - 6

काय सांगतात ही सगळी प्रकरणे? या केवळ थरारक हेरकथा नाहीत. एक समाज म्हणून आपले चारित्र्य काय आहे हे या कथा सांगत आहेत. त्याचबरोबर आपल्यासारख्या सामान्य माणसांनाही काही धडे देत आहेत.  

आपल्या मनावर एक चित्र कोरलेले असते. पाकिस्तानसाठी हेरगिरी करतात ते त्यांचे धर्मबांधवच. ते तेवढे देशद्रोही. त्यांच्या निष्ठा केवळ धर्मापायी... गैरसमज असतात ते. वास्तव फारच कटू आणि भीषण असते. गेल्या सुमारे दोन-तीन वर्षांतील उपरोक्त घटना पाहिल्या तर हेच दिसेल, की आपल्या समजुतीत फार मोठे घोटाळे आहेत. आपली लैंगिक आणि आर्थिक हवस यापायी देशास विकणारे हिंदूही आहेत आणि मुसलमानही. या सगळ्यातून आपण जे धडे घ्यायला हवेत त्यातील हा एक महत्त्वाचा धडा आहे. 

यातील कोणी खरोखरच विषकन्यांची शिकार बनलेले असतील वा धनाच्या मोहाचे बळी ठरलेले असतील. पण त्यांच्याकडे नेहमीच एक पर्याय होता - फितुरी न करण्याचा, गद्दारी न करण्याचा. तो त्यांनी स्वीकारला नाही हे (निदान पोलिस यंत्रणांच्या सांगण्यानुसार तरी) स्पष्टच दिसत आहे. तेव्हा जेव्हा कोणत्याही पर्यायातला एक पर्याय देश विकणे हा असतो, तेव्हा तो कोणतीही किंमत देवून नाकारायचा असतो. हा या प्रकरणातला दुसरा धडा आहे.

येथे कोणाला असे वाटू शकते, की एक सामान्य नागरिक आपण. कोणाच्याही अध्यात-मध्यात नसलेले. साधेसुधे. आपली माती, आपली माणसं, आपली नोकरी यांतच रमणारे. कायदाप्रेमी आणि जमेल तेवढे देशप्रेमीही. आपल्याला या धड्यांचा काय फायदा? आपल्याकडे कुठून येणार या विषकन्या आणि कोण दाखविणार आपल्याला धनाची लालूच? 

पण असे समजण्याचे कारण नाही. हेरसंस्थांना केवळ लष्करी वा तत्सम गुपितेच हवी असतात असे नव्हे. दुसरी बाब म्हणजे समाजमाध्यमातील विषकन्या या केवळ स्त्रियाच असतात आणि त्या केवळ गुपिते वगैरे जाणून घेण्यासाठीच नेमलेल्या असतात असेही नाही. या माध्यमांचा वापर गरळ ओकण्यासाठीही केला जात असतो. त्याचेच दुसरे नाव आहे - साय-वॉर. सायकॉलॉजिकल वॉरफेअर. फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅप ही या मनाच्या मैदानावर खेळल्या जाणा-या या युद्धातील अस्त्रे आहेत.

त्यावरून या देशाच्या लोकशाही मूल्यांना चूड लावणारा, या देशातील सहिष्णुतावादाला, उदारमतवादी परंपरांना चूड लावणारा मजकूर प्रसृत करणे, सामाजिक-धार्मिक तेढ निर्माण करणे असे सातत्याने चाललेले असते. देशाचा पाया खिळखिळा करणे हा त्यामागील हेतू. हे करणा-या विषकन्या वा विषपुत्र हे कोणीही असू शकतात.

त्यांची नावे कोणतीही असू शकतात. त्यातील कोणी 'किरण रंधावा’ असेल वा ‘सेजल कपूर’. आपण मात्र, सावध राहायला हवे. कोणताही संदेश फॉरवर्ड करताना हे तर नीटच पाहायला हवे, की आपल्याला ज्याने तो संदेश पाठविला, माहिती पाठविली त्यामागे कोणी विषकन्या वा विषपुत्र तर नाही ना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com