
Panchatantra financial lessons
esakal
पंचतंत्राच्या गोष्टी! लहानपणी आपल्यापैकी प्रत्येकानेच या ऐकल्या, वाचल्या असतील. हजारो वर्षांपूर्वी लिहिलेल्या आणि आपल्याला आई-बाबा, आजी-आजोबांकडून ऐकायला मिळालेल्या या गोष्टी! त्यांचं आणि आजच्या शेअर मार्केट, बजेटिंग आणि इन्व्हेस्टमेंटचं काय कनेक्शन असेल?
ऐकायला थोडं विचित्रच वाटेल, पण ही जुनी गोष्टींची गुपितं आजही आपल्या पैशांच्या व्यवहारात १००% लागू होतात. तसं बघायला गेलं तर, आता मोबाईलमध्ये बजेट ॲप्स आहेत, गुंतवणुकीसाठी भन्नाट ऑप्शन्स आहेत, पण खरं सांगायचं तर, पैसे जपून वापरणं, बचत करणं, धीर धरणं आणि योग्य जोखीम घेणं ही तत्वं आजही तीच आहेत. पूर्वी ही शिकवण कथांच्या माध्यमातून दिली जायची.
चला, तर मग पंचतंत्राच्या या 'गोल्डन' कथांमधून आजच्या 'डिजिटल' जगातले 'आर्थिक ज्ञान' उलगडूया आजच्या 'सकाळ प्लस'च्या या विशेष लेखातून...