physicswallah
Esakal
मुंबई - मागील दोन दिवसांपासून ‘फिजिक्सवाला’ हे नाव भारतीय शेअर बाजारात चांगलेच गाजताना दिसत आहे. त्याचा आयपीओ नुकताच बाजारात आला असून पहिल्याच दिवशी लिस्टेड किंमतीच्या ४४ टक्के वाढ होऊन बंद झाला. तीन दिवसांनी आता तो पुन्हा काहीसा खाली आला आहे. पण फिजिक्सवाला काय आहे, याची सध्या इतकी चर्चा का होते आहे, ही मुळात कोणती कंपनी आहे, शिक्षण क्षेत्रात वेगळी उंची गाठणारी कंपनी म्हणून तिचं नाव का येत आहे? या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हे देशातील सर्वात तरुण अब्जाधीश बनले आहेत, तर त्यांचे व्यावसायिक भागीदार देखील अब्जाधीशांच्या एका यादीत आहेत.
'सकाळ+' च्या माध्यमातून जाणून घेऊया की, PhysicsWallah या एज्युटेक कंपनीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात नेमका काय प्रयोग होतो आहे? हा प्रयोग करणारी ही अब्जाधीश मंडळी नेमकी कोण आहेत आणि JEE, NEET, GATE तसेच शालेय शिक्षणात नेमके कोणते आणि कसे शिक्षण दिले जाते आहे.