

अनुभवातून शिकवण आणि जीवनाचे धडे
E sakal
श्रीकांत जाधव
“दिनचर्येत केवळ क्षणांची नोंद; वर्षांमध्ये म्हणजेच अनुभवामध्ये मात्र संपूर्ण आयुष्याची शिकवण..!,” असा राल्फ वाल्डो एमर्सन यांचा विचार म्हणजे जणू काळाच्या अनुभवानं माणसाला मिळणारी शहाणपणाची गुरुकिल्ली आहे.
एखादी घटना जेव्हा घडते, तेव्हा आपण लगेच ती समजून घेतो, तिचा अर्थ लावतो; पण त्या मागील खरे मुद्दे, खोल परिणाम, सामाजिक किंवा वैयक्तिक बदल हे सर्व सहजपणे कधीच दिसत नाही. दिवस आपल्या समोर केवळ घटनांची मालिका मांडतात, पण त्यांच्या अर्थपूर्ण छटा, हे केवळ काळाच्या ओघात, वर्षांचा मागोवा घेतल्यानंतर समोर येते. उलट, वर्षानुवर्षांच्या अनुभवातून माणूस अधिक समजूतदार, विचारी, प्रसंगी संयमी आणि दूरदृष्टीचा बनतो.