Premium|Political Defections : पक्षांतर, सत्तेची स्पर्धा आणि वक्तव्यांचा राजकीय खेळ

Power and Public Statements : राजकारणातील पक्षांतर, बेधडक वक्तव्ये आणि सत्तेच्या स्पर्धेवर उपरोधिक भाष्य करताना, लेखात राजकीय संधीसाधूपणा, जिभेवरील नियंत्रण आणि सार्वजनिक जीवनातील जबाबदारीचा वेध घेण्यात आला आहे.
Political Defections

Political Defections

esakal

Updated on

सध्या राजकारण्यांचा तोडा सुरू आहे. शेतकऱ्यांच्या बागेत जेव्हा भाज्या, फुलांसारखी पिके तयार होतात तेव्हा शेतकरी तोडा करायला घेतात. त्याला ‘तोड्याचा हंगाम’ असे म्हणतात. एकदा का तोडा झाला, की दलाल ती पिके बाजारात नेऊन विकायला मोकळा असतो. सध्या राजकारण्यांचे हंगामी पीक तोड्यावर आलेले आहे. मालाला भावही चांगला आहे.

विशेष म्हणजे, यंदा बाजार गरम आहे. मालाची कोणतीही प्रतवारी न करता, येईल त्या प्रत्येक नगास उत्तम किंमत मिळते आहे. तुमच्या मालाला डाग असला काय, त्याच्यावर अळी पडलेली असली काय किंवा तो पार सडून नासलेला का असेना, नगास नग कुठलाही माल एकाच दरात विकत घेतला जातोय. त्यामुळे हे तयार पीक बाजारात झुमकताना दिसतेय.

जीभ हा मानवी शरीरातील सर्वात बहुपयोगी स्नायूमय अवयवांपैकी एक आहे. जीभ पचनसंस्था, संवादकला आणि संवेदनाक्षमता या तिन्हींसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जीभ मुख्यतः आठ स्नायूंनी बनलेली असते आणि तिच्यावर श्लेष्मल त्वचा असते. जिभेच्या वरच्या पृष्ठभागावर असलेल्या पॅपिली नावाच्या सूक्ष्म उंचवट्यांमध्ये स्वादकळ्या असतात. शिवाय जिभेचा मागील भाग घशाशी जोडलेला असतो, त्यामुळे पुढील भाग मुक्तपणे हालचाल करू शकतो... पण जिभेची ही हालचाल नेमकी कशासाठी करायची, याचे काही अलिखित नियम आहेत. माझ्यासारख्या खादाड माणसासाठी चव ओळखणे, हे जिभेचे मुख्य कार्य असू शकते. ज्या लोकांना संभाषण किंवा संवादकलेची आवड आहे त्यांच्यासाठीसुद्धा जीभ अत्यंत महत्त्वाचा अवयव असू शकतो. कारण, स्पष्ट उच्चार आणि शब्दनिर्मितीसाठी जीभ अत्यावश्यक आहे. याव्यतिरिक्त अन्न दातांकडे ढकलणे, ते लाळेसोबत मिसळणे, अन्नाचा गोळा तयार करून घशाकडे ढकलणे, अशी इतर महत्त्वाची कामेदेखील हा अवयव करतो; मात्र तुमचे तुमच्या जिभेच्या स्नायूंवर नीट नियंत्रण नसेल, तर अन्न घशात अडकणार नाही कदाचित; पण शब्द नको त्या ठिकाणी जाऊन अडकू शकतात. त्यातल्या त्यात जर तुम्ही सार्वजनिक जीवनात वावरणारे असाल तर जिभेच्या वाकड्या वळणामुळे तुमचा अगदी तेजोभंगसुद्धा होऊ शकतो. त्यामुळे हा लवचिक अवयव प्रत्येकाने जपूनच वापरायला हवा.

Political Defections
Premium| Nepal's Unrest: जगभर होणाऱ्या आंदोलनांमध्ये आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दे कसे जोडले गेले?
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com