
सुनील चावके
संशयाचे वातावरण निर्माण करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांमुळे मोदी सरकार कचाट्यात सापडले आहे. या प्रश्नांचा उलगडा येत्या तीस दिवसांमध्ये होणार आहे. त्यामुळेच यंदाचा सप्टेंबर महिना चर्चेचा विषय ठरला आणि ठरतो आहे.
अ वघ्या देशाच्या ज्यावर नजरा खिळल्या आहेत तो सप्टेंबर महिना अखेर उगवला. २०२५ मधील बहुप्रतिक्षित महिना! सप्टेंबर २०२५ मध्ये देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारे काही तरी नाट्यमय घडेल, अशी भविष्यवाणी मागच्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासूनच वर्तविली जात होती. अखेर ती घडी आली आहे.