Share Market मध्ये IPO चा पाऊस, जाणून घ्या शेअर मिळवण्याची प्रक्रिया
Share Market मध्ये IPO चा पाऊस, जाणून घ्या शेअर मिळवण्याची प्रक्रियाEsakal

Share Market आयपीओंचा पाऊस, जाणून घ्या शेअर मिळवण्याची प्रक्रिया

सध्या परत तेजीने मजबूत पकड मिळविली असल्याने प्राथमिक शेअर बाजारात पुन्हा ‘आयपीओं’चा पाऊस पडत आहे. शेअर बाजाराकडे नव्या गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ही उत्तमच घटना आहे, परिणामी खूप नवे गुंतवणूकदार आयपीओंना अर्ज करत आहेत. तर जाणून घेऊयात IPO खरेदीच्या प्रक्रियेबाबत

नंदिनी वैद्य

नुकत्याच संपलेल्या वर्ल्ड कप क्रिकेटमध्ये जशी पहिल्या सर्व सामन्यांमध्ये ‘टीम इंडिया’ने धुवाँधार बॅटिंग केली, तशीच तऱ्हा आता प्राथमिक समभाग विक्रीच्या अर्थात ‘आयपीओं’च्या बाजारात चालू आहे. दिवाळी संपल्यानंतरची ही दिवाळीच म्हणावी लागेल. बाजारात येणाऱ्या ‘आयपीओं’ना गुंतवणूकदारांचा Investors जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या निमित्ताने सध्या चर्चेत असलेल्या ‘आयपीओं’च्या IPO Market बाजारावर टाकलेला प्रकाश.

सध्या एका पाठोपाठ एक असा प्राथमिक समभाग विक्रीचा Shares अर्थात ‘आयपीओं’चा सपाटा चालू आहे आणि नजीकच्या काळात तो चालू राहणार आहे, असे दिसते. गेल्या २० ते २४ नोव्हेंबरदरम्यान आलेल्या विविध इश्यूंमध्ये टाटा टेक्नॉलाजीजच्या Tata Technology इश्यूला सर्वाधिक ६९ पट मागणी, गंधार ऑईल ६४ पट, फ्लेअर रायटिंगला ४७ पट, इरेडाला ३८ पट अशी प्रचंड मागणी आली.

रकमेच्या भाषेत बोलायचे झाले, तर २.५ लाख कोटी इतक्या मोठ्या रकमेची मागणी या सर्व इश्यूंना आली. ही संख्या यासाठी महत्त्वाची आहे, की केवढी प्रचंड तरलता Liquidity बाजारात उपलब्ध होत आहे आणि इक्विटी बाजारात Equity Market येण्यासाठी उत्सुक आहे याची ही पावती! Share Market Marathi News Know This Before applying for Company IPO

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com