
आयटीमध्ये नोकरी करायचीये काय केले पाहिजे?
- अमोल अवचिते
आजच्या अधुनिक जगात तंत्रज्ञानाला महत्व अधिक आहे. जस जसे आपण पुढे जात राहू. तसे हे क्षेत्र वाढतच जाणार आहे. त्यामुळे तंत्रज्ञान हा एक देखील आता रोजच्या जगण्याच्या एक भागच झाला आहे. याला सोडून आपला दैनंदिन व्यवहार करणे देखील कठीण होऊ शकते. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
आपल्या आजूबाजूला जीवनमान सुलभ होण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयटी पसरले आहे. जसे हे तंत्रज्ञान आपले एक जीवनाचा भाग बनला आहे. तसाच तो रोजगार देखील मोठ्या प्रमाणात देऊ लागला आहे. हे आता जगमान्य आहे. परंतू यामध्ये मराठी मुलांच्या पारंपारिक शिक्षण पध्दतीमुळे तसेच विशिष्ट भाषेच्या न्यूनगंडामुळे या क्षेत्रातील नोकरीकडे हव्या तेवढया महत्वकांक्षेने पाहिले जात नाही. असे निरीक्षण या क्षेत्रातील तज्ञांचे आहे. आय़टी मध्ये फक्त इंजिनिअरच केले झालेले असावे. असा काही नियम नाही. इतर शाखेतील उमेदवाराला देखील या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी आहेत. त्याकडे उघड्या डोळ्यांनी बघण्याची फक्त गरज आहे.
हेही वाचा: फुटबॉल विश्वाचे वर्ष २०२१!
आयटी कंपन्यामध्ये १ लाख ८२ हजार पदांसाठी मेगा भरती
या क्षेत्रातील आघाडीच्या पाच कंपन्यामध्ये २०२२-२३ या अर्थिक वर्षात १ लाख ८२ हजार पदांसाठी भरती होणार आहे. यासोबतच पुणे, मुंबई शहारांतील या कंपन्यांसह दर तीन महिन्याला १५ हजार पदांसाठी भरती होत असते. या भरतीसाठी आपण आतापासूनच तयारीत असणे गरजेचे आहे. मात्र खालील परिस्थितीतून आपण मार्ग काढला तर नक्कीच यावर मात करुन आयटी क्षेत्रात नोकरी मिळवून आपले जीवन आपण ऐटीत जगू शकतो.
कोरोनामुळे लॉकडाउन लावण्यात आले होते. अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. याच दरम्यान माहिती आणि तंत्रज्ञान (आय टी) क्षेत्राचे महत्व वाढले. त्यातून अनेक ऑप निर्णाण झाले. मात्र तेवढ्या प्रमाणात कौशल्य असेलेले मनुष्यबळ मिळू शकले नाही. त्यामुळे आयटी क्षेत्रात पुढच्या सहा महिन्यात मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी निर्माण होणार आहेत. असे असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा: Heropanti Trailer: 'बबलु ढुंढनेसे नही किस्मत से मिलता है'
आजच्या आधुनिक जगात आयटी क्षेत्राचे महत्व वाढले आहे. तसेच दिवसेंदिवस याचे महत्व वाढत जाणार आहे. त्यामुळे या क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढत राहणार असून त्यासाठी फक्त अभियांत्रिकीचीच शाखा असलीच पाहिजे असे काही नाही. विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेतील पदवी असली आणि आयटी नोकरीसाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण आणि कौशल्ये आत्मसात केली की, नोकरीची संधी आपल्यासमोर उपलब्ध आहे. आयटी क्षेत्रात नवनवीन कल्पनांना वाव असतो. त्यामुळे कोणीही त्या कल्पना मांडू शकतो. ती कल्पना कागदावर मांडून त्यावर संशोधन केले जाते. हे काम डेव्हल्पर्स करतो. आणि त्यातून एखादे सॅफटवेअर प्रत्यक्षात निर्माण होते. कल्पना सुचण्यासाठी तुम्ही कोणत्या शाखेचे आहात हा प्रश्न येत नाही. त्यामुळे या आयटी क्षेत्रात काम करण्याची सुरवात कधीही करता येऊ शकते. या बाजारात हजारो कौशल्ये आधारित कोर्सेस उपलब्ध आहेत. मात्र यासाठी संगणकीय भाषाचे ज्ञान आवश्यक असते. सोप्या भाषेचे ज्ञान घेऊन आयटीत कामाची सुरवात करता येते. अनुभवाने ज्ञान वाढते. त्यामुळे एकदा पाया पक्का होणे आवश्यक असते. जेवढ्या या क्षेत्रात येयाचे त्यांनी आतापासूनच सुरवात केली पाहिजे.
राज्यातील कोठूनही घेता येऊ शकते ज्ञान कोरोनाने घरातून काम करण्याचे आता सर्वांनी शिकवले आहे. त्यात शिक्षण ही आता ऑनलाइन झाले आहे. त्यामुळे आपण जेथे कोठे आहोत तिथूनच ऑनलाइन कोर्सेस करता येतात. तसेच नोकरी शोधत फिरत बसण्याची ही गरज नाही. कारण ऑनलाइनच मुलाखत देता येते. नोकरी लागली की, कंपनीच घरी लॅपटॅप पाठवते. त्यामुळे घर बसल्या पुढील सहा महिन्यात आवश्यक कैशल्ये आत्मासात केली तर नक्कीच या संधीचा फायदा घेता येऊ शकेल. पगार अपेक्षापेक्षा अधिक मिळू शकतो.
हेही वाचा: सोन्याच्या व्यवसायात मराठी माणसाची अटकेपार मजल !
पुण्यात एकूण आयटी कंपन्या संख्या
५०० हून अधिक नामंकित कंपन्या
१५०० हून अधिक सर्वसाधारण कंपन्या.
नोकरीच्या किती जागांसाठी होती भरती
दर तीन महिन्याला १५ हजार जागांसाठी होते भरती.
अशा मिळून वर्षाला ४५ हजार पदे भरली जातात.
पुण्यात येथे या भागात आहेत कंपण्या
खराडी आयटी पार्क
हिंजवडी
मगरपट्टा
येरवडा
कल्याणी नगर
विमाननगर
फुरसुंगी
देशात येथे आहेत मोठे आयटी हब
बंगलोर, हैद्राबाद, पुणे, मुंबई, दिल्ली, चेन्नई.
मध्यम आकारचे आयटी हब
इंदूर, म्हैसूर, भुवनेश्वर, नागपुर, कोंईमतूर, अहमदाबाद.
देशात माहिती व तंत्रज्ञान (आयटी) या क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत मराठी भाषकांचे प्रमाण नगण्य असून पाच टक्क्यांपेक्षाही अधिक नसल्याचे दिसून येते. असे तज्ञ सांगतात.
हेही वाचा: मातृत्वाला तिसरा पर्याय; आईनेच दिले लेकीला गर्भाशय
देशात सहा ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे तसेच मध्यम स्वरूपाचे आयटी हब आहेत. या क्षेत्रात देशात १५ लाख कर्मचारी प्रत्यक्ष आयटी क्षेत्रात काम करणारे आहेत. तर ४५ लाखांहून अधिक कर्मचारी आयटी सेवांशी संबंधित (सर्व्हिसेस) काम करतात.
आयटी क्षेत्रात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध असून मराठी मुले याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते. बौद्धिक क्षमता असून ही केवळ इंग्रजी भाषेच्या न्यूनगंडामुळे या क्षेत्रापासून दूर धावत आहेत. पुणे, मुंबई मध्ये नोकरीच्या संधी सातत्याने निर्माण होत असतात. मात्र घराबसून सर्वकाही ही हवे, अशी मानसिकता मराठी मुलांची आहे. आता मात्र कोरोना आणि लॉकडाउन ही देखील इच्छा पुरविली आहे. कारण आता घरात बसूनही काम करता येण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे इच्छा शक्ती असेल तर आयटी मध्ये काम करुन आटीत जगण्याची सुवर्ण संधी आताच्या काळात आहे. त्यासाठी फक्त आयटी क्षेत्राला लागणारी कौशल्ये आत्मसात करण्याची गरज आहे.
या कारणांमुळे मराठी मुले कमी पडतात-
- संभाषण कौशल्यांचा अभाव
- इंग्रजी भाषेचा न्यूनगंड
- व्यक्तिमत्त्व विकसनाची कमतरता
- आयटीसाठी आवश्यक असणारी कौशल्ये माहीत नसणे
- कौशल्य अवगत करण्याची उदासीनता
- स्थलांतर करण्याची इच्छा नसणे
हेही वाचा: 'द गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड'ला इतकं महत्त्व का? कशी झाली याची सुरूवात?
आयटीमध्ये नोकरी करायची आहे तर काय केले पाहिजे .
आयटी क्षेत्रात नोकरी करायची असेल तर सर्व प्रथम मनातील इंग्रजी भाषेची भीती दूर केली पाहिजे. सर्व सामान्य हा भाषा असून ती फक्त किमान बोलता येणे एवढेच आपेक्षित आहे. त्यातील आपण तज्ञ असण्याची खर तर काहीच आवश्यकता नाही. काही मोजकी वाक्य आपल्या तोंडी बसली की आपले काम सोपे होते. हे सर्व सरावाने आत्मसात करता येते.
घरच्या परीस्थितीमुळे जर आपल्याला इंजिनिअरनिंग करता आले नाही तर खर काळजी करण्यासारखे काहीच नाही. कारण कोणतीही शाखा असली आयटी आणि आयटी संबंधी सेवांमध्ये आपल्याला नोकरीची संधी मिळू शकते. त्यासाठी सुरवातीला आपल्याला छोट्या कंपणी पासून सुरवात करावी लागेल. कॉल सेंटर मध्ये नोकरी करावी लागेल. यामध्ये काही महिन्यांचा अनुभव घेतल्यानंतर आयटीशी संबंधित काही कोर्सेस करावे लागतील. त्याचे ज्ञान अत्मासात केले की, आपण घेतलेल्या ज्ञानाच्या आधारावर मुलाखतीची तयारी सुरु करुन प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे गेले की, पहिल्या, दुसऱ्या प्रयत्नात चांगल्या प्रगाराची नोकरी मिळवता येऊ शकते. हे सर्व सरळसाधे दिसत असले तरी हा मार्ग सोपा नसून तसा काही अंशी कठीण आहे. मात्र यावर फक्त सरावानेच मात करता येते. त्यासाठी मनात आत्मविश्वास, कष्ट करण्याची तयारी आणि मोठे होण्याचे स्वप्न मनात असावे लागते. तरच आपल्याला आपले आयुष्य ऐटीत जगायला उपयोगी ठरु शकणाऱ्या क्षेत्रात आपण स्थिरावू शकतो.
जर खरच या क्षेत्रात करिअर करु इच्छित असाल तर आतापासूनच तयारीला लागा. पुढील सहा महिन्यात नक्कीच आयटीत असाल.
सर्वसाधारण पणे खालील कोर्सेस करुन आयटीतील नोकरी मिळवता येऊ शकत. कोर्सेससह मोठ्या संख्येने वेगवेगळे कोर्सेस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
Data Science
Artificial intelligence and Machine learning
Cloud computing (AZURE & AWS)
DevOps
Hadoop
Programming Languages ( Java, Python)
Cyber Security
Digital Marketing
Big Data Engineering
Data analyst
Web Designing
Software Development
Software Testing
Full stack development
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा.”