टेलिस्कोपची दुनिया! |The largest known telescope | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टेलिस्कोपची दुनिया!}

टेलिस्कोपची दुनिया!

मनुष्याद्वारे कधी हा अंदाज देखील लावला गेला नाही की, पृथ्वी या ग्रहा व्यतिरिक्त इतर ग्रहांचा अभ्यास केला जाईल. हळू-हळू काळ बदलते गेला, सोबतच या गोष्टीची जाणीव झाली आणि याच बरोबर मानवाने अवकाशातील घटकांचा अभ्यास करण्याचे ठरवले. इतर ग्रहांवर पृथ्वीप्रमाणे प्राण्यांचे अस्तित्व आहे का, पृथ्वीतील वातावरण आणि इतर ग्रहांवर असलेल्या वातावरणात नेमके काय अंतर आहे, पृथीवर आढळणारे द्रवपदार्थ इतर ग्रहांवर देखील आहेत का आणि किती प्रमाणात, अशा बऱ्याच गोष्टींचा शोध घेण्यासाठी जगभरातील कित्येक देशांनी अवकाशातील मोहिमा पार पडल्या.

गेलीलीयोचा टेलिस्कोपच्या निर्मितीनंतर चंद्राला समजणे आणि चंद्राची छायाचित्रे रेखाटने सोपे झाले, तेव्हा मात्र खगोलशास्त्रात लोकांची रुची वाढत गेली. हळू हळू टेलिस्कोपच्या तंत्रामध्ये हवे तसे बदल करण्यात आले आणि टेलेस्कोपला आधुनिक काळाप्रमाणे विकसित करण्यात आले. टेलिस्कोपचे बदलते स्वरूप नवनवीन शोध लावण्यास यशस्वी ठरले. टेलिस्कोपचा वापर जगभरात केला जातो, आणि याचाच साह्याने अंतराळाशी संबंधित नवीन माहिती जगाला बहाल करण्यात येते.

हेही वाचा: ओटीटी - नंगा-पुंगा दोस्त?

जगभरात चर्चेत असलेल्या काही टेलिस्कोप संदर्भातील माहिती खालील प्रमाणे-

१. जेम्स वेब अवकाश दुर्बीण (स्पेस टेलिस्कोप) -

या टेलिस्कोपची निर्मिती नासाने युरोपियन अंतराळ संस्था आणि कॅनेडियन अंतराळ संस्था यांच्या मदतीने केली. तर हा अवरक्त (इन्फ्रारेड) टेलिस्कोप म्हणून ओळखला जातो. हबल टेलिस्कोपच्या तुलनेत जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप १०० पटींनी जास्त प्रबळ आहे.
आजपर्यंतचा सर्वात शक्तिशाली, प्रबळ टेलिस्कोप म्हणून जेम्स वेब स्पेस टेलेस्कोपला ओळखले जाते. जेडब्ल्यूएसटी हबलच्या तुलनेत अधिक संवेदनशीलता प्रदान करेल, तर खगोलशास्त्र आणि विश्वउत्पत्तिशास्त्राच्या क्षेत्रात विस्तृत तपासणी करेल. ब्रह्मांडमधील सर्वात दूरच्या प्रसंगाचे आणि वस्तूंचे निरीक्षण करेल. त्याचबरोबर इतर ग्रह, ताऱ्यांची निर्मिती कशी झाली याचा शोध लावण्यास कारणीभूत ठरेल.

२. हबल स्पेस टेलिस्कोप -

या अवकाश दुर्बिणीचे नाव खगोलशास्त्र एडविन हबल यांच्या सन्मानार्थ ठेवण्यात आले आहे. २४ एप्रिल, १९९० रोजी या टेलिस्कोपचे प्रक्षेपण करण्यात आले. आजपर्यंत या टेलिस्कोपच्या माध्यमातून सुमारे १.३ अब्जपेक्षा जास्त निरीक्षणे केली गेली आहेत. हा सर्वात मोठा टेलिस्कोप आहे. अवकाशातील घडामोडींचा विस्तृत छायाचित्रण करणे, ब्रह्मांडचा विस्ताराच्या दाराची अचूक गणना करणे, अशा वेगवेगळ्या निरीक्षणासाठी हबल टेलिस्कोपचा वापर केला जातो.

३. हाय अल्टिट्यूड गॅमा रे टेलिस्कोप (हागर)-

खगोलशास्त्राशी संबंधित निरीक्षणासाठी वापरण्यात येणाऱ्या या टेलिस्कोपची स्थापना लद्दाख मध्ये करण्यात आली आहे. या वेधशाळेमध्ये ७ टेलिस्कोप लावण्यात एका वैशिष्ट्य पद्धतीत उभारण्यात आले आहेत. प्रत्येक टेलिस्कोपमध्ये ७ आरसे आहेत आणि त्यांचा एकूण क्षेत्रफळ ४.४ चौरस मीटर इतका आहे.

४. स्पिट्जर स्पेस टेलिस्कोप-
स्पिट्जर स्पेस टेलिस्कोप २००३ मध्ये अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले होते. हा टेलिस्कोप एक इन्फ्रारेड अवकाश दुर्बीण म्हणून ओळखला जातो. तर या टेलेस्कोपचा वापर अॅन्ड्रोमेडा आकाशगंगातील ताऱ्यांच्या निरीक्षणासाठी करण्यात येतो. हे तारे आकाशगंगांच्या ताऱ्यांच्या संख्ये पेक्षा दुप्पट आहेत. स्पिट्जर स्पेस टेलिस्कोपवर बसवलेल्या तीन उपकरणांमध्ये- इन्फ्रारेड अरे कॅमेरा (आयआरएसी), इन्फ्रारेड स्पेक्ट्रोग्राफी (आयएस) आणि स्पिट्जरसाठी मल्टिबँड इमेजिंग फोटोमीटर (एमआयपीएस) यांचा समावेश आहे. स्पिट्जर नासाचा एक मोठा आणि मुख्य टेलिस्कोप म्हणून ओळखला जातो. स्पिट्जर पृथ्वीच्या अनुसरणी (ट्रेलिंग) कक्षेत फिरणारे पहिले अंतराळयान होते. या अंतराळयानाच्या मदतीने अवकाशातील आढळणाऱ्या सर्वात दूरच्या घटकांचा शोध लावला असून शास्त्रज्ञांना याचा अभ्यास करणे देखील सोपे झाले.

हेही वाचा: मेटाव्हर्समध्ये तुमचे स्वागत आहे!

५. हिमालयन चंद्रा टेलिस्कोप-

हिमालयन चंद्रा टेलिस्कोप २.०१ मीटर (६.५ फूट) व्यास असलेला ऑप्टिकल-इन्फ्रारेड टेलिस्कोप आहे, तर या टेलेस्कोपेला नोबेल पुरस्कार विजेते सुब्रह्मण्यम चंद्रशेखर यांचा सन्मानार्थी नाव देण्यात आले आहे. टेलिस्कोपची निर्मिती अमेरिकेच्या ऍरिझोना येथील टक्सन येथे इलेक्ट्रो-ऑप्टिकल सिस्टम टेक्नॉलॉजीज इंकद्वारे केली गेली. तर या टेलिस्कोपवर ३ वैज्ञानिक उपकरणे बसविण्यात आले आहेत. हिमालय फेंट ऑब्जेक्ट स्पेक्ट्रोग्राफ (एचएफओएससी), आयआर इमेजर आणि ऑप्टिकल सीसीडी इमेजर अशा हे उपकरणांचा समावेश आहे. या टेलेस्कोपेला 'इन्सॅट-३बी' या उपग्रहाच्या साह्याने ऑपरेट करण्यात येते, जे हिवाळ्यात उप-शून्य तापमानात देखील काम करते.

६. वेणू बाप्पू वेधशाळा (ऑब्सर्व्हेटरी) -

ही वेधशाळा तमिळनाडू येथील वेल्लोर मध्ये उभारण्यात आली आहे. आकाशातील सखोल अभ्यास आणि निरीक्षण करण्यासाठी या दुर्बिणीचा वापर केला जातो. अवकाशातील दोन महत्त्वाच्या शोधांमध्ये या टेलिस्कोपचे योगदान आहे. १९७२ मध्ये ब्रहस्पतिचा उपग्रह गेनिमेडच्या वातावरणाचा शोध आणि १९७७ मध्ये युरेनस ग्रहाच्या भोवती रिंग्सचा शोध लावण्यासाठी करण्यात आलेल्या निरीक्षणात सुद्धा या टेलेस्कोपचा सहभाग होता. याच बरोबर १७ फेब्रुवारी १९८८ मध्ये ४५ से.मी. श्मिट दुर्बिणीचा वापर करून एक नवीन लघुग्रह शोधण्यात आला. या लघुग्रहाला भारतीय गणिततज्ज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचे नाव "४१३० रामानुजन" असे देण्यात आले. हा २०व्या दशकातील भारताचा पहिला शोध होता.

७. गिरवली वेधशाळा-

गिरवली वेधशाळा (ऑब्सर्व्हेटरी) हे जुन्नर मध्ये उभारण्यात आले आहे. इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अॅन्ड अॅस्ट्रोफिजिक्स (आयुका) या संशोधन संस्थेने या वेधशाळेची निर्मिती केली. या वेधशाळेत असलेल्या टेलीस्कोपला, टेलिस्कोप टेक्नॉलॉजीज लिमिटेड (लिव्हरपूल, यूके) या कंपनीने तयार केला व २००६ मध्ये आयुकला हस्तांतरित केला.

हा टेलिस्कोप रिफ्लेक्टींग प्रकाराचा असून यातील असलेल्या आरशाचे व्यास २ मीटर आहे. तर हा टेलिस्कोप भारतात तिसऱ्या क्रमांकावर आहे. हा टेलिस्कोप २२ अंश ते ९० अंशात व उभा फिरतो, त्याचबरोबर स्वतः भोवती ३६० अंशात फिरण्याची क्षमता या टेलिस्कोपमध्ये आहे. त्यामुळे या दिशेमध्ये दिसणाऱ्या सर्व ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यात येतो. तसेच जर एखादा ग्रह २२ अंशापेक्षा खाली असेल तर त्या ग्रहाच्या अभ्यासासाठी, ग्रहाची वरती येण्याची वाट बघावी लागते. तर या टेलीस्कोपसाठी अंदाजे २५ कोटी रुपये खर्च आला.

८. माऊंट अबू इन्फ्रारेड वेधशाळा (मीरो) -


माऊंट अबू इन्फ्रारेड वेधशाळेला अरावल्ली श्रेणीच्या सर्वोच्च शिखरावर सुमारे १६८० मीटर उंचीवर उभारण्यात आले आहे. या वेधशाळेत १.२ मी इन्फ्रारेड टेलिस्कोप, निकमॉस इन्फ्रारेड कॅमेरा आणि स्पेक्ट्रोग्राफ, इमेजिंग फॅब्री-पेरॉट स्पेक्ट्रोमिटर, ऑप्टिकल सीसीडी, ऑप्टिकल इमेजिंग पोलरीमीटर व फायबर-लिंक्ड ग्रेटींग स्पेक्टरोग्राफ सारख्या उपकरणांचा समावेश आहे. तर या व्यतिरिक्त ५० सेमी दुर्बीण, स्वयंचलित (ऑटोमेटेड) टेलिस्कोप (एटीव्हीएस) सारख्या यंत्रणांचा वापर तारे, धूमकेतूंसारखे अवकाशातील इतर घटकांचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. याचबरोबर जमिनीवर आधारित छायाचित्रणासाठी ४३ सेमी दुर्बिणीची स्थापना करण्यात आली आहे.

९. आर्यभट्ट संशोधन वेधशाळा (एरिस)-

आर्यभट्ट संशोधन वेधशाळा (एरिस) नैनीताल, उत्तराखंडमधील एक आघाडीची संशोधन संस्था आहे जी खगोलशास्त्र, खगोलभौतिक आणि पर्यावरणीय विज्ञान या क्षेत्रांवर कार्य करते. सूर्य, तारे आणि आकाशगंगा यांच्याशी संबंधित संशोधन या वेधशाळेद्वारे करण्यात येतात. त्याच बरोबर ताऱ्यांचे समूह (स्टार क्लस्टर) आणि गामा किरणांच्या स्फोटांसारख्या (जीआरबी) संशोधनांमध्ये एरिसने महत्त्वाचे योगदान दिले. कॅनरी बेट किंवा ऑस्ट्रेलियामध्ये दिवसा ज्या निरीक्षण करता येत नाहीत, ते निरीक्षण या वेधशाळेमधून करता येतात. या वेधशाळेच्या भौगोलिक स्थापनेमुळे आणि चांगल्या खगोलशास्त्रीय निरीक्षणामुळे खगोलशास्त्रीय क्षेत्रात महत्त्वाचे संशोधन घडले आहेत.

इलेक्ट्रॉनिक, यांत्रिकी आणि उपकरणांच्या ऑप्टिकल देखरेखीसाठी या संस्थेमध्ये एक कार्यशाळा देखील स्थापित करण्यात आली आहे. एरिसकडे इंटरनेट सुविधा असलेले एक आधुनिक संगणक केंद्र आहे. तसेच खगोलशास्त्र, खगोलभौतिक आणि पर्यावरणीय विज्ञानसारख्या विषयांच्या पुस्तकांचे उत्कृष्ट संग्रह असलेले ग्रंथालय आहे. १०,००० हून अधिक जर्नल्सची देखील साथ देण्यात आली आहे.

१०. वैश्विक किरण प्रयोगशाळा-

वैश्विक किरण प्रयोगशाळा तमिळनाडू येथील उटी मध्ये आहे. १९५५ मध्ये बी.वी. श्रीकांत यांनी उटी येथील कॉस्मिक रे प्रयोगशाळेत (सीआरएल) संशोधनाची सुरवात केली. या प्रयोगशाळेत अनेक प्रयोग करण्यात आले. जगातील सर्वात मोठे 'क्लाऊड चेंबर्स'च्या प्रयोगाचे नियंत्रण या प्रयोगशाळेमधून करण्यात आले. तसेच 'एअर शॉवर अ‍ॅरे'चा भाग म्हणून या क्लाऊड चेंबरला येथे चालविण्यात आले. सत्तरच्या दशकाच्या सुरवातीस 'प्रोटॉन्स' आणि 'पायन्स'च्या केंद्रकांवर (न्युक्लअस) वैश्विक किरणांचा प्रभाव तसेच, ऊर्जेच्या प्रमाणात आढळणारे बदल याचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी 'एअर चेरेनकोव्ह काउंटर', 'मल्टीप्लेट क्लाऊड चेंबर' आणि 'स्पेक्ट्रोमीटर' यांचा वापर करून तिहेरी रचना करण्यात आली. सीआरएलमध्ये 'कॉस्मिक' किरणांच्या संशोधनाचे काम सुरू ठेवण्यासाठी, 'ग्रॅप्स -१' या पहिल्या प्रयोगात सातत्याने सुधारणा करण्यात आली.

टॅग्स :EarthPlanet