नोबेल पुरस्कारांची अशी झाली सुरुवात...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नोबेल पुरस्कारांची अशी झाली सुरुवात...!}

नोबेल पुरस्कारांची अशी झाली सुरुवात...!

sakal_logo
By
सम्राट कदम @namastesamrat

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित होणाऱ्या नोबेल पुरस्कारांकडे साऱ्या जगाचे लक्ष लागलेले असते. कारण सध्यातरी या जीवसृष्टीवरचा सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून ‘नोबेल’कडे पाहिले जाते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्रा क्षेत्रातल्या उल्लेखणिय कामगिरीसाठी दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. नक्की नोबेल पुरस्कारांमागची पार्श्वभुमी काय? हा पुरस्कार कोणी सुरू केला? का सुरू केला ?या पुरस्कार विजेत्यांमध्ये भारतीयांची नावे आहेत का, याचाच घेतलेला हा आढावा

नोबेल नाव कसे आले?

स्वीडनचे वैज्ञानिक अल्फ्रेड नोबेल यांच्या नावावरून पुरस्काराचे नाव नोबेल असे ठेवण्यात आले आहे. प्रथम आपण नोबेल यांच्याबद्दल जाणून घेऊयात. युरोपातील स्वीडन देशात स्टॉकहोममध्ये २१ ऑक्टोबर १८३३ मध्ये अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म झाला. त्यांचे वडील बर्नार्ड नोबेल हे पेशाने इंजिनियर आणि संशोधक होते. त्यांनी स्टॉकहोममध्ये अनेक पुल आणि इमारती बांधल्या होत्या. अल्फ्रेड हे रशियामध्ये लहानाचे मोठे झाले. फ्रान्स आणि अमेरिकेमध्ये त्यांनी रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलं.

हेही वाचा: धाव क्रीडासंस्कृतीच्या दिशेने

मृत्यूपत्रातून नोबेल पुरस्कार..

नोबेल पुरस्कारा इंतकंच अल्फ्रेड यांनी लावलेला डायनामाईटच्या शोधाने जगाचा परिप्रेक्ष्यच बदलला आहे. त्यातूनच पुढे नोबेल पुरस्काराची निर्मिती कशी झाली आपण जाणून घेऊयात. खरं तर अल्फ्रेड नोबेल यांना साहित्यातही रस होता. त्यांचा विविध भाषांमध्ये हातखंडा होता. वयाच्या १७व्या वर्षी त्यांना स्विडीश, रशियन, फ्रेंच, इंग्लिश आणि जर्मन या भाषा येत होत्या. ते कविता रचत आणि नाटकंही लिहीत. साहित्य, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रात त्यांना रस होता. सामाजिक आणि शांततेशी संबंधित घडामोडींमध्ये नोबेल यांना रस होता. नोबेल यांनी आपल्या मृत्यूपत्राद्वारे तब्बल १६.५ कोटी डॉलर्सची संपत्ती जागतिक पातळीवरचे पुरस्कार स्थापन करण्यासाठी दान केली. त्यांनी त्यांची बहुतांश संपत्ती या पुरस्कारांसाठी दिल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा तेव्हा नोबेल पुरस्कारांना विरोध होता. त्यांच्या मृत्यूच्या तब्बल ५ वर्षांनी १९०१मध्ये पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले. रेड क्रॉसच्या हेन्री डनंट यांना पहिलं नोबेल मिळालं.

अर्थशास्त्रातला ‘नोबेल’ पुरस्कार नंतर आला

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात. या सगळ्या क्षेत्रांमध्ये अल्फ्रेड नोबेल यांना प्रचंड रस होता. आधीच्या १२ महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो. नोबेल यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात लिहीलं आहे, ‘‘आधीच्या वर्षभरात मानवजातीसाठी महत्त्वाचं ठरणारं काम करणाऱ्यांना हे पुरस्कार देण्यात यावेत’’. या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने १९६८ मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही. अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

हेही वाचा: राजकारणात ‘शहरं’ ठरताहेत प्रभावशाली!

अशी होते निवड..

सहा नोबेल पुरस्कारांपैकी पाच पुरस्कार विजेत्यांची निवड स्वीडनमध्ये केली जाते. तर शांततेसाठीच्या पुरस्कार विजेत्यांची निवड नॉर्वेमध्ये केली जाते. शिक्षणतज्ज्ञ, विद्यापीठांचे प्राध्यापक, वैज्ञानिक, पूर्वीचे विजेत आणि इतर मिळून नामांकनं दाखल करतात. त्यानंतर त्यातून काही नावं अंतीमतः निवडली जातात. पुरस्कारासाठी विचार करण्यात येत असलेल्या व्यक्तींची यादी नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार पुढची ५० वर्षं प्रसिद्ध केली जाऊ शकत नाही. पुरस्कार विजेत्यांना लॉरिएट्स म्हटलं जातं. प्राचीन ग्रीसमध्ये विजेत्यांना Bay Laurel च्या पानांनी गुंफलेली डोक्यावर अडकवायची शिरपेच दिला जाई. त्यावरुन हा लॉरिएट्स शब्द आलेला आहे.

हेही वाचा: राजकारणात ‘शहरं’ ठरताहेत प्रभावशाली!

नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार प्रत्येक क्षेत्रात जास्तीत जास्त तीन विजेत्यांची निवड एकाच वर्षी केली जाऊ शकते. अशीही काही वर्षं होती ज्यावेळी हे पुरस्कार देण्यात आले नाही. पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धादरम्यान हे पुरस्कार देण्यात आले नव्हते. यासोबतच नोबेल फाऊंडेशनच्या नियमांनुसार जर एखाद्या वर्षी, एखाद्या क्षेत्रात कोणीच जर पुरस्कारासाठी पात्र नसेल तर पुरस्कार दिला जात नाही. त्या बक्षीसाचा निधी पुढच्या वर्षीसाठी राखून ठेवला जातो

- नोबेल पुरस्कारांचे प्रसिद्ध विजेते..

प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईनस्टाईन (१९२१ भौतिकशास्त्र), मेरी क्युरी (१९०३ भौतिकशास्त्र आणि १९११ रसायनशास्त्र), इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद यांना २०१९साठीचा शांतता पुरस्कार देण्यात आला होता. त्यांनी पुढाकार घेत इथिओपियाचा एरिट्रियासोबतचा २० वर्षांपासूनचा लष्करी तिढा सोडवला होता. अण्वस्त्र विरोधी गट असणाऱ्या ‘इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्युक्लियर वेपन्स’ अर्थात ‘आयकॅन’ (ICAN ) चळवळीला 2017चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला होता.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना 2009 मध्ये शांततेसाठीचं नोबेल देण्यात आलं. "आंतरराष्ट्रीय संबंध सुधारण्यासाठी आणि लोकांमधील सहकार्य भावना वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल" त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

आपल्यासाठी हा एक सुखद धक्का असून याबद्दल आपण कृतज्ञ असल्याचं ओबामांनी म्हटलं होतं. पण त्यांना पुरस्कार देण्यात आल्याबद्दल टीकाही झाली होती. कारण हा पुरस्कार जाहीर होण्याआधी केवळ 12 दिवसांपूर्वी त्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली होती.

यासोबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर (2002), मुलींच्या शिक्षणासाठी चळवळ उभारणारी कार्यकर्ती मलाला युसुफजाई (संयुक्तपणे 2014मध्ये), युरोपियन युनियन (2012), युनायटेड नेशन्स आणि त्यांचे सरचिटणीस कोफी अन्नान (2001मध्ये संयुक्तपणे) आणि मदर टेरेसा (1979) यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

तर रविंद्रनाथ टागोर यांना 1913 साली साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार मिळणारे ते पहिले युरोपियन नसलेले साहित्यिक ठरले होते.

लेखक आणि विचारवंत जॉन - पॉल सार्त्र यांनी 1964मध्ये हा पुरस्कार नाकारला होता. तर व्हिएतनामचे राजकारणी ल ड्युक थो यांनी 1973मध्ये पुरस्कार नाकारला. तर इतर चार जणांवर त्यांच्या देशांनी हा पुरस्कार नाकारण्याची जबरदस्ती केली. 2016मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार गायक बॉब डिलन यांना देण्यात आला होता.

भारतीय नोबेल विजेते

  • रविंद्रनाथ टागोर - १९१३ साहित्य

  • सर चंद्रशेखर वेंकट ऊर्फ सी. व्ही. रमण - १९३० भौतिकशास्त्र

  • हरगोविंद खुराणा - १९६८ वैद्यकशास्त्र

  • मदर टेरेसा - १९७९ शांतता पुरस्कार

  • सुब्रमण्यम चंद्रशेखर - १९८३ भौतिकशास्त्र

  • अमर्त्य सेन - १९९८ अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार

  • सर व्ही. एस. नायपॉल - २००१ साहित्य

  • वेंकटरमणन रामकृष्णन - २००९ रसायनशास्त्र

  • कैलाश सत्यार्थी - २०१४ - शांतता पुरस्कार (मलाला युसुफजाई यांच्यासह)

  • अभिजीत बॅनर्जी - २०१९ - अर्थशास्त्रासाठीचा नोबेल समितीने सुरू केलेला पुरस्कार (एस्थर डुफ्लो यांच्यासह)

नोबेल पुरस्कार विजेत्यांना बक्षीस काय मिळतं?

प्रत्येक नोबेल लॉरिएट म्हणजेच पुरस्कार विजेत्याला तीन गोष्टी मिळतात. नोबेल डिप्लोमा. हा प्रत्येक डिप्लोमा म्हणजेच मानपत्र कलाकुसरीचं सर्वोत्तम उदाहरण असतं. सोबतच पुरस्कार विजेत्यांना नोबेल पदक दिलं जातं. प्रत्येक क्षेत्रानुसार याचं डिझाईनही वेगवेगळं असतं. शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कार पदकावरील अल्फ्रेड नोबेल यांचं चित्रं इतर पदकांपेक्षा थोडं वेगळं असतं. मानपत्र आणि पदक यासोबत विजेत्याला ९० लाख स्वीडिश क्रोना म्हणजे सध्याच्या दरानुसार सुमारे ७.६५ कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जातं. एका क्षेत्रात जर एकापेक्षा जास्त विजेते असतील तर हा निधी विभागून दिला जातो. पुरस्कार विजेत्यांनी लेक्चर दिल्यानंतरच त्यांना हा निधी मिळतो. आल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी १० डिसेंबरला हा पुरस्कार सोहळा स्टॉकहोम आणि ओस्लो इथे पार पडतो.

हेही वाचा: मावळातील अल्पपरिचित लेणी आणि धबधबे

२०२१ चे नोबेल पुरस्कार

- शांतता ः

नोबेल समिती म्हणेतत ‘‘स्वतंत्रता, मुक्त आणि तथ्यांवर आधारित पत्रकारिता ही सत्तेचा दुरुपयोग, असत्य आणि युद्ध दुष्प्रचारापासून संरक्षण करते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहितीचे स्वातंत्र्य हे लोकांना जागरुक करते. हे अधिकार लोकशाहीची पूर्वअट आहे. तसेच युद्ध परिस्थिती आणि संघर्षात संरक्षण करते. मारिया आणि दिमित्री यांना हा पुरस्कार जाहीर होणे म्हणजे मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याचे महत्त्व अधोरेखित करत आहे.’’

- भौतिकशास्त्र ः

यंदाच्या भौतिकशास्त्राच्या नोबेल पारितोषिकासाठी अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठातील डॉ. स्युकुरो मनाबे, जर्मनीतील मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट ऑफ मेटीओरोलॉजीमधील डॉ. क्लाऊस हॅसलमन हे दोघे हवामान शास्त्रज्ञ आणि रोम (इटली) येथील सॅपिएन्झा विद्यापीठातील जॉर्जिओ पॅरिसी या भौतिकशास्त्रज्ञांची निवड करण्यात आली आहे. पृथ्वीच्या हवामानासारख्या क्लिष्ट रचनांचे आचरण उलगडणे आणि अणुपासून ते ग्रहांच्या पातळीपर्यंत विस्कळित पदार्थांमधील परस्पर प्रक्रियांच्या अभ्यासासाठी या शास्त्रज्ञांना हा सन्मान जाहीर झाला आहे.

- अर्थशास्त्र ः

नोबेल पुरस्काराने सन्मानि होणारे अर्थतज्ज्ञ अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये अध्यापनाचे, संशोधनाचे कार्य करत आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठात डेव्हिड कार्ड, मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये डॉ. जोशुआ डी एंग्रिस्ट आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात डॉ. गुइडो इम्बेन्स हे कार्यरत आहेत. रॉयल स्वीडिश अॅकेडमी ऑफ सायन्सने म्हटले की, या तीन अर्थ शास्त्रज्ञांनी आर्थिक विज्ञानात मोठे योगदान दिले आहे.

- साहित्य ः

वसाहतवादाच्या परिणामांचा शोध घेण्यासह आखाती देशातील नागरिकांवर झालेले त्याचे परिणाम, निर्वासितांच्या समस्या या साऱ्याचा यथार्थ वेध गुरनाह यांनी आपल्या साहित्यात घेतला’, असेही अकादमीने म्हटले आहे. नोबेल पारितोषिकाच्या साहित्य विभागाचे प्रमुख अँड्रेस ओल्सन म्हणाले, ‘जगातील वसाहतवादोत्तर काळातील अब्दुलरझाक हे एक महत्त्वाचे लेखक असून, त्यांची निरीक्षणे, त्यांनी वसाहतवादावर केलेले भाष्य आदी गोष्टींचा विचार करून त्यांना नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात येत आहे.’

रसायनशास्त्र ः

पुरस्कार विजेते

डॉ. बेंजामिन लिस्ट : जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे १९६८ मध्ये जन्मलेल्या लिस्ट यांचे पीएचडीचे शिक्षण फ्रँकफर्ट येथील गोएथ विद्यापीठातून झाले. ऑरगॅनिक केमिस्ट्री हा त्यांचा विषय असून, ते सध्या मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यूट फॉर कोल रिसर्चचे संचालक आहेत.

डॉ. डेव्हिड डब्ल्यू. सी. मॅकमिलन : १९६८ मध्ये स्कॉटलंड येथे जन्मलेल्या मॅकमिलन यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून १९९६ मध्ये पीएचडी पूर्ण केली. २००६ पासून ते प्रिन्स्टन विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. रसायनशास्त्रातील प्रख्यात नियतकालिक ‘केमिकल सायन्स’चे संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

वैद्यकीय ः

वैद्यकिय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार डेव्हिड ज्युलिअस आणि अर्डेम पटापौटियन यांना मिळाला आहे. या दोघांनीही तापमान आणि स्पर्श संवेदना जाणवण्यासाठी रिसेप्टर्सवर संशोधन केलं आहे. मागच्या वर्षी हा पुरस्कार हार्वे अल्टर, मायकल हॉगटन आणि चार्लस राईस या तिघांमध्ये विभागून देण्यात आला होता. या तिघांनीही मिळून हॅपिटायटीस विषाणूवर संशोधन केलं होतं.

go to top