घरी आल्यावरही ऑफिसचं काम.! भारतातही 'Right to Disconnect' ची मागणी का होतेय?

अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्याने मांडलं 'राईट तू डिस्कनेक्ट' विधेयक
Exhausted by office work
Exhausted by office work Esakal

मुंबई: क्लाएन्ट कॉल वर आहेत.. लगेच कॉल जॉईन करा.. आताच्या आता लॉग इन करा हे माझ्या आताच्या कंपनीत होत नाही त्यामुळेच मला इथे काम करायला जास्त आवडते.. २९ वर्षीय आयटी क्षेत्रात काम करणारे जयदेव आपल्या कामाबद्दल सांगतात.

ते म्हणतात.. सध्या मी ज्या कंपनीत काम करतो आहे तिथे खूप चांगली कामाची संस्कृती आहे, जिथे तुम्हाला सुटीच्या दिवशी, कामाच्या तासांव्यतिरिक्त त्रास द्यायचा नाही असा काही नियम नाही पण त्यांच्या कामाच्या संस्कृतीचा भाग आहे. ही युके बेस्ड कंपनी आहे.

परंतु याआधी मी एका भारतीय आयटी कंपनीत कामाला होतो तिथे कामाच्या तासांव्यतिरिक्त तर काम होतेच आणि शनिवार रविवार या दिवशीही आमचा मॅनेजर तुम्हाला कॉल करत असे आणि थोडा वेळ लॉग इन करायला सांगत असे. त्या ऑफीसमध्ये तुमचा मॅनेजर कसा आहे यावर देखील अनेक गोष्टी अवलंबून असतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com