Sam Altman Back : ..आणि सॅम ऑल्टमन 'ओपन एआय' मध्ये परतणार.!

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात नाट्यमय घडामोडी
Open AI team
Open AI team Esakal

पुणे - मागील चार दिवसांत अतिशय नाट्यमय घडामोडी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स'च्या क्षेत्रात घडल्या. चार दिवसांतील सगळ्यांचे लक्ष लागलेल्या घटनेत साऱ्या जगाचा जीव भांड्यात पाडणारी घटना बुधवारी घडली.

'चॅट जीपीटी' चे सर्वेसर्वा आणि ओपन एआय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम ऑल्टमन अनेक ट्विस्ट आणि टर्न घेत पुन्हा 'ओपन एआय' (Open AI )मध्ये येणार हे जाहीर झाले. परंतु नक्की या नाटकाचा शेवट झाला की याचा दुसरा भाग येणार?

चार दिवसांतील घडामोडी

१८ नोव्हेंबर २०२३ रोजी एआय क्षेत्रातील महत्वाची कंपनी असणाऱ्या 'ओपन एआय' चे (Open AI) मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सॅम ऑल्टमन (Sam Altman) यांना कंपनीच्या संचालक मंडळाकडून तडकाफडकी काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

सॅम ऑल्टमन, ग्रेग ब्रॉकमन यांना हा धक्का होता. दोनच दिवसांत मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नडेला यांनी हे दोघेही मायक्रोसॉफ्ट मध्ये येणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर ओपन एआय कंपनीतील जवळपास 500 कर्मचाऱ्यांनी आम्ही सॅम ऑल्टमन यांच्यासोबत असून जर त्यांना कामावर परत घेतले नाही तर आम्हीही काम करणार नाही असे पत्र कंपनीला दिले.

यानंतर इल्या सुटस्किवर यांनी सॅम ऑल्टमन यांची जाहीर माफी मागितली आणि बुधवारी दुपारी अखेर सॅम ऑल्टमन यांनी आपण पुन्हा 'ओपन एआय' मध्ये येणार जाहीर हे केले.

जाहीर व्यासपीठावर सुरु होते 'एक्स वॉर'

मागील चार दिवसांत होणाऱ्या या सगळ्या घडामोडी चार भिंतींच्या आत नाही तर 'एक्स' (x)(पूर्वीचे ट्विटर) वर सुरु होत्या. त्यामुळे जगभरातील तंत्रज्ञानाशी संबंधित मंडळी यांच्या पोस्टकडे डोळे ठेऊन होती. कर्मचाऱ्यांमधील एक प्रकारचे हे शीतयुद्धाच होते. पण या शीत युद्धात सुद्धा कोणीही आपली पातळी सोडून वक्तव्य केली नाहीत ही बाब उल्लेखनीयच म्हणावी लागेल.

सॅम ऑल्टमन सर्व परिस्थितीत शांतच

सॅम ऑल्टमन यांना काढून टाकण्याचा निर्णय तडकाफडकी झालेला. मात्र तरीही मला यातून खूप शिकायला मिळाले आणि माझं कंपनीवर खूप प्रेम आहे असेच ते म्हणाले. मायक्रोसॉफ्टमध्ये जाण्याची घोषणा झाल्यावर देखील मी 'ओपन एआय' सोबत आहे आणि आपण मिळून काम करू असेच ऑल्टमन म्हणाले. आणि आता परत येण्याची घोषणा केल्यावर देखील त्यांनी त्यांच्या टीमचा उल्लेख केला.

अनेक धक्कादायक घटना घडून देखील कोणाहीबद्दल एक अवाक्षर देखील ऑल्टमन यांनी वाईट काढले नाही किंवा रागही व्यक्त केला नाही. त्यामुळे त्यांचे कौतुक होताना दिसत आहे.

Open AI team
Sam Altman Fired : 'ChatGPT' बनवणाऱ्या Open AIमध्ये मोठी उलथापालथ; दोन संस्थापक कंपनीतून बाहेर

मोडलेला डाव मायक्रोसॉफ्टने सावरला?

मायक्रोसॉफ्ट हा ओपन एआय मधला सर्वात मोठा गुंतवणूकदार त्यामुळे या कंपनीत वादाची ठिणगी मायक्रोसॉफ्टला महागात पडणारी होती. बाहेर पडलेले सॅम ऑल्टमन हे एकटे नव्हते त्यांच्या मागे त्यांची सर्व टीम होती हे सत्या नडेला यांनी जाणले होते.

दोघांच्या भांडणात जर प्रतिस्पर्धक कंपनीने ऑल्टमन यांना त्यांच्या बाजूने वळविले असते तर मायक्रोसॉफ्टची गुंतवणूक कदाचित फसली असती. म्हणूनच 'मदर कंपनी' ची भूमिका बजावत मायक्रोसॉफ्टने हा एकूणच विस्कटलेला डाव सावरला असे म्हणता येईल.

पुढील काळात इल्या सुटस्किवर कंपनीत राहणार?

सॅम ऑल्टमन यांना तडकाफडकी काढण्यामागे कंपनीचे सहसंस्थपाक इल्या सुटस्किवर हे नाराज होते अशी चर्चा होती. त्यांनीच या सर्व प्रकारानंतर जाहीर माफी मागितली होती.

त्यामुळे हा संघर्ष वरवर जरी मिटलेला दिसत असला तरीही अजून धग असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच आता पुढील काळात इल्या सुटस्किवर कंपनीत राहणार की जाणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

Open AI team
Sam Altman : चॅट जीपीटी तयार करणाऱ्या 'ओपन एआय'चे सीईओ सॅम ऑल्टमन मायक्रोसॉफ्टमध्ये का गेले?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com