What is hyperloop technology Why is it needed in Pune
What is hyperloop technology Why is it needed in Pune

काय आहे हायपरलूप तंत्रज्ञान? पुण्यात याची गरज का?

Published on

जागतिक पातळीवर बदलत असलेले आधुनिक तंत्रज्ञान (Modern technology), युद्धनीती (tactics)आणि याचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराला (Indian Army) लागणारी अद्ययावत उपकरणे ही वेळेत उपलब्ध होणे गरजेचे आहे. सीमावर्ती भागात होत असलेल्या घडामोडी पाहता आता भारतीय सैन्याला अशा प्रकारचे उपकरणांचा पुरवठा अत्यंत कमी वेळेत पोचवण्यासाठी 'हायपरलूप रेल्वे'(Hyperloop Railway) या तंत्रज्ञनाची आवश्यकता आहे. मात्र भारतात अशा प्रकारची सुविधा निर्माण करण्यासाठी काय अडचणी आहे? ही सुविधा उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा संरक्षण क्षेत्राला (defense sector) कसा होईल? याचाच आढावा घेणार हा लेख.

भारताने आत्मनिर्भर भारत या संकल्पने अंतर्गत देशातील उद्याग, स्टार्टअप आणि शैक्षणिक संस्थांना संधी निर्माण झाली आहे. संरक्षण दलासाठी अनेक स्वदेशी वाहणे, उपकरणे, तंत्रज्ञान, शस्त्र, क्षेपणास्त्र आदींची निर्मिती यशस्वी चाचणी आणि त्यांचा वापर तिन्ही दलांद्वारे करण्यात येत आहे. आज देशाची स्वदेशीकडे वाटचाल होत असली तरी या उत्पादनांची मागणी सुध्दा वाढत आहे. तसेच उत्तर पश्चिमी आणि पूर्वेकडील शत्रू देशांद्वारे सीमावर्ती भागात सातत्याने अस्थिरता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. ( What is hyperloop technology Why is it needed in Pune)

भौगोलिदृष्ट्या सीमावर्ती भागातील प्रतिकूल परिस्थिती यामुळे संसाधनांचा पुरवठा करण्यात अडचणी येतात. जम्मू काश्मीर भागात हिवाळ्यात बर्फवृष्टी मुळे रस्ते बंद होतात. यावेळी सैन्याची ये जा देखील थांबते. अशा परिस्थितीमध्ये संसाधनांचा पुरवठा करणे शक्य नसते. यासाठी सध्या जम्मू-काश्मीरच्या कारगिल जिल्ह्यात जोझिला पास या बोगद्याचे बांधकाम सुरू आहे. हा प्रकल्प दुर्गम भागाला जोडणारा असला तरी या मार्फत देशाच्या इतर राज्य जोडलेले नाही. त्यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास सैन्याला लागणारी सामग्री इतर राज्यातून, शहरातून थेट सीमावर्ती भागात कमी वेळेत पोचविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण अशा हायपरलूप प्रकल्पाची गरज आहे. ज्याच्या माध्यमातून केवळ काही मिनिटांच्या कालावधीत सैन्याला लागणाऱ्या शस्त्रापासून ते अत्यावश्यक मदातीपर्यंत सर्व काही सैन्याला त्वरित उपलब्ध होईल. त्यासाठी या प्रकल्पाची सूरवात पुण्यातून होणे अपेक्षित आहे. गेल्या काही वर्षांपासून पुणे शहर संरक्षण उत्पादनासाठी तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान विकासासाठी यशस्वीपणे पुढे येताना दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com